शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वनविभागात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता!

By admin | Published: June 17, 2016 12:23 AM

मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्तांतर्गत २७ मे रोजी झालेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

लॉबीचा आरोप : तीन टर्म सेवा दिलेल्यांना पुन्हा मेळघाटात बदलीअमरावती : मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्तांतर्गत २७ मे रोजी झालेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन ते तीन टर्म मेळघाटात सेवा दिल्यानंतर पुन्हा मेळघाटात बदली करण्यात आल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.वरुड वनपरिक्षेत्रअंतर्गत राजुरा बाजार वनबीटमध्ये कार्यरत वनरक्षक अ‍े.जी. चक्रवर्ती यांनी मुख्य वनसंरक्षकांनी बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याबाबतची तक्रार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. वडाळी, मोर्शी, परतवाडा या वनक्षेत्रात ८ ते १० वर्षांपासून एकाच जागी ठिय्या मांडून बसलेल्या वनरक्षक, वनपालांची बदली का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी वनमंत्र्यांकडे केला आहे. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक तिवारी यांच्या आदेशाअन्वये प्रशासकीय कारणास्तव वरुड वनपरिक्षेत्रात बदली करण्यात आली होती. येथे दोन वर्षे सेवा पूर्ण न होता २७ मे २०१६ रोजी धारगड वनपरिक्षेत्रात पुन्हा बदली करण्यात आली आहे. यापूर्वी धारगड वनपरिक्षेत्रात कर्तव्य बजावले असताना पुन्हा त्याच ठिकाणी बदली करण्याचे कारण काय? ही बाबदेखील चक्रवती यांनी उपस्थित केली आहे. बदली करताना विशेष ‘लॉबी’चा वापर केला जात असून मलई लाटण्याच्या जागांवर मर्जीतील वनरक्षक, वनपाल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वरुड येथे मुलींचे शिक्षण सुरू असल्याची विनंती करूनही मुख्य वनसंरक्षकांनी मेळघाटात बदली केली आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी घरी कोणीही नसताना बदली करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. २७ मे रोजी झालेल्या बदली विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. कलम ११५(३) एम.आर.टी.यू अ‍ॅन्ड पी.यू.एल.पी. अंतर्गत न्यायालयीन तक्रार क्र. ६५/२०१६ अन्वये मुख्य वनसंरक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मेळघाटात दोन ते तीन वेळा सेवा देऊन परतलेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदलीचा प्रस्ताव कशाच्या आधारे वरिष्ठांपुढे सादर करण्यात आला, यामागे मोठे षड्यंत्र असल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)