फोटो - २२एएमपीएच०५, २२एएमपीएच०६
कॅप्शन - मेळघाटातील सिपना नदी दुथडी भरून वाहत आहे.
---------------------------------------------------------------------------------
नदी-नाले फुगले : मेळघाटात ढगफुटीसम पाऊस, मुख्यालयाशी संपर्क तुटला, दरड कोसळल्या, चार प्रकल्पांची दारे उघडली
अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने संततधार लावल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. मेळघाटातील अनेक दुर्गम गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला असून, तेथील सिपना नदीने रुद्रावतार धारण केला. दरम्यान, जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाची संपूर्ण नऊ, सापन व शहानूर प्रकल्पाची प्रत्येेकी चार दारे गुरुवारी उघडण्यात आली. संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मेळघाटला बसला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच घनदाट जंगलात ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सिपना नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला. सेमाडोहनजीक भूतखोरा नाल्यावरील पूल खचला. परिणामी, परतवाडा-धारणी-खंडवा इंदूर मार्ग बंद केला जाणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा या गावात गुरुवारी पहाटे ५ वाजता नजीकच्या बोर्डी नदीच्या पुराचे पाणी घुसून गावकऱ्यांच्या घरादारांचे मोठे नुकसान झाले. गावाशेजारी अर्ध्या किमी अंतरावरून वाहणाऱ्या या नदीची संरक्षणभिंत आधीच पडली होती. तेथून पाण्याचे लोंढे शिरले. गावकरी झोपेतून सावरत असताना पाणी शिरल्याची आरडाओरड सुरू झाली. काही कळायच्या आतच पाण्याने घरेदारे व्यापून गेली. धारणी तालुक्यातील जवळपास १७० गावांपैकी ५० गावांचा संपर्क बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत तुटला होता. मेळघाटातील वीजपुरवठा सुमारे १२ तासांपासून खंडित आहे.