शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Vidhan Sabha Election 2019; शाकाहारी भोजन ५०, मांसाहारी १४० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:09 PM

निवडणूक काळात उमेदवारांच्या संभाव्य खर्चासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दरसूची उमेदवारांना दिली आहे. त्यानुसारच आता उमेदवारांचा खर्च ग्राह्य धरला जाणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाची दरसूचीयानुसारच उमेदवारांना द्यावा लागणार निवडणूक खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतमोजणीपर्यंतच्या कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला दैनंदिन खर्च निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. मात्र, खर्च मर्यादेच्या आत राहावा, यासाठी दर कमी दाखविण्याचा प्रकार उमेदवारांकडून केला जातो. त्यामुळे निवडणूक काळात उमेदवारांच्या संभाव्य खर्चासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दरसूची उमेदवारांना दिली आहे. त्यानुसारच आता उमेदवारांचा खर्च ग्राह्य धरला जाणार आहे.आयोगाद्वारे विधानसभेसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये आहे व या मर्यादेच्या आतच उमेदवारांना निवडणूक खर्च करणे अनिवार्य आहे. निवडणूक म्हटली की, कार्यकर्त्याची फौज आलीच व त्यांच्या सरबराईसाठी किमान निवडणुकीच्या काळात तरी उमेदवार खर्च कमी पडू देत नाहीत. याव्यतिरिक्त नेत्यांच्या सभा, बैठकी, वाहने, चहा, नाष्टा, जेवण, हार-तुरे या सर्व बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र, हा खर्च लपविण्याचा किंवा कमी दाखविण्याचा खटाटोप उमेदवारांद्वारे केला जातो. यावर आयोगाच्या तिसºया डोळ्याचा ‘वॉच’ असतो व त्यामुळे खर्च कमी दाखविण्याच प्रकार उमेदवारांच्या अंगलट येऊ शकतो.प्रत्येक मतदारसंघासाठी आयोगाद्वारे पथके गठित करण्यात आलेली आहेत. याव्यतिरिक्त स्वतंत्र निवडणूक ऑब्झर्व्हर यासाठी दिलेला आहे. याव्यरिक्तही ‘सी व्हिजिल’ हे अ‍ॅप आचारसंहितेच्या उल्लंघनावर वॉच करण्यासाठी आयोगाने दिलेले आहे. याद्वारे सर्वसामान्य नागरिक स्वत:ची ओळख लपवून ऑनलाइन तक्रार करू शकतो. त्यामुळे उमेदवाराला निवडणूक खर्च लपविणे आता कठीण झालेले आहे. निवडणूक काळात होणारा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाद्वारे जाहीर दरसूचीनुसारच द्यावा लागणार आहे. निवडणूक खर्चात कमी दाखविण्याचा प्रकार करणे उमेदवाराला महागात पडणार आहे.निवडणूक खर्च निरीक्षकांच्या पडताळणीत खर्च जर जास्त झालेला आढळल्यास त्यांची झालेली निवड रद्ददेखील होऊ शकते. हा धोका उमेदवारांना परवडणारा नाही.

सभेसाठी येणाऱ्या खर्चासाठीही दरसूचीझेंडू व गुलाबाचा हार ३०० रुपये, साऊंड सिस्टीम १५,०००, भित्तिपत्रके ३०० रुपये प्रतिनग, वाहनचालक ५५० रुपये प्रतिदिन, कापडी झेंडे १० रुपये प्रतिनग, व्यासपीठ सेंट्रिंग ३० रुपये, लोखंडी ४० रुपये, पाइप पेंडाल ३० रुपये, डोम ३० रुपये, शामियाना ३० रुपये चौरस फूट, गादी ५० रुपये, पॅन लहान १०० रुपये, मोठा ३०० रुपये, टोपी १० रुपये नग, हॅलोजन १००० वॅट १०० रुपये, जनरेटर २००० ते ५००० प्रति पाच तास, स्वागत गेट ३००० रुपये प्रति नग.

चहा १०, नाष्टा २० रुपये प्लेटनिवडणूक विभागाच्या दरसूचीनुसार शाकाहारी भोजन ५० रुपये प्रतिव्यक्ती, मांसाहारी भोजन १४० रुपये, राईस प्लेट ५० रुपये, अल्पामध्ये पोहे, उपमा, कचोरी, समोसा आदी २० रुपये प्लेट, चहा, कॉफी १० रुपये, २० लिटरचा पाणी जार २५ रुपये, एक लिटरची पाणी बॉटल १२ रुपये तसेच शीतपेय किंवा रस १५ रुपये याप्रमाणे निवडणूक खर्चात नोंद करावी लागणार आहे.

ऑटोरिक्षा, कार अन् ट्रकही दरसूचीतऑटोरिक्षा २४ तासासाठी १३०० रुपये, ऑटोरिक्षा सहा आसनी १५०० रुपये, कार १७०० ते ३००० रुपये २४ तासांसाठी, जीप आदी वाहने १८०० ते २०००, टेम्पो सहाचाकी ३८०० रुपये, ट्रक ३८०० ते ९३०० रुपये, बस १७ आसनी ३८०० रुपये, ३० आसनी ५९०० रुपये, अ‍ॅम्ब्यूलन्स सर्व सुविधायुक्त ३५०० रुपये असा दर राहणार आहे.

भित्तिपत्रके, हस्तपत्रकांचेही दर जाहीरनिशाण्या दोन बाय दोन प्रति नग ३००, भित्तिपत्रके ११ बाय १८ इंच प्रति ५०० नग ५५०० रुपये, हस्तपत्रके ए-फोर १००० नग ६००० रुपये, कटआउट १५० ते ३०० रुपये, डिजिटल टिव्ही २ ते ३ तास १००० रुपये, प्रोजेक्टर डिस्प्ले ३००० रुपये प्रतितास, सभा चित्रण ३००० रुपये प्रतितास, माहितीपट चित्रीकरण १५ ते २० मिनिटे १५००० रुपये असा दर राहणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019