शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

चिखलदरा घाटात वाहनांचा जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:08 PM

येथे हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केल्याने हरिअमराई घाटात वाहने तब्बल दोन तास जाम लागला होता. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सदर प्रकार घडला. या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी होत असताना वनविभागाचा एकही कर्मचारी नव्हता.

ठळक मुद्देदुचाकीस्वारांची हुल्लडबाजी : नंदनवनात हजारो पर्यटकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : येथे हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केल्याने हरिअमराई घाटात वाहने तब्बल दोन तास जाम लागला होता. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सदर प्रकार घडला. या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी होत असताना वनविभागाचा एकही कर्मचारी नव्हता.चिखलदरा पर्यटन स्थळावर शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत आहेत. ते शेकडो वाहनातून येत असल्यामुळे रस्ताने मनमानेल तसी वाहन उभी केल्याचा प्रकार होत आहे.त्यामुळे ठिकठिकाणच्या पार्इंटवर वाहनांचा जाम लागत आहे.परतवाडा येथून घटांग आणि धामणगाव गढी मार्गाने ठिकठिकाणी उंच पहाडावरून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांतून निघणारे पांढरे शुभ्र दाट धुके, पर्यटकांना भुरळ घालणारे ठरले आहे. परिणामी फोटो काढण्याच्या मोहात सर्व व नियम धाब्यावर बसविले जात आहे. चिखलदरा शहरात पोलिसांनी बाहेरूनच वाहने वळविल्यामुळे या आठवड्यात मात्र वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले.हरिआमराई पॉइंट रामभरोसेमडकीनजीकचा हरिआमराई पॉइंट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला आहे. त्या बंधाºयातून पाणी ओसंडून वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक अगदी रस्त्यावर वाहने लावतात.या प्रकाराला स्थानिक पोलिसांनी देखील आळा घालावा.कार दरीत, दुचाकीस्वाराला अपघातपर्यटकांच्या वाहनाला पंचबोल पॉइंट रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने यात सर्व सुखरूप बचावले. रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत ही कार घसरली. काही हुल्लडबाज भरधाव दुचाकी चालवत असल्याचे चित्र होते. येथील वन उद्यानानजीक दारू पिऊन दुचाकी घसरून पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले.२०० फूट खोल दरीत कार कोसळलीचिखलदऱ्याहून अमरावतीकडे परतणाऱ्या एका कुटुंबाचे चारचाकी वाहन रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास २०० फु ट खोल दरीत कोसळले. मोथा नजिकच्या सेल्फि पॉर्इंटखाली ही घटना घडली. दरम्यान या मार्गाने परतणाऱ्या पर्यटकांनी दोराच्या सहाय्याने त्या वाहनातील पाचही जणांना दरीबाहेर काढले. अमरावतीचे ते कुटूंब जखमी झाले आहे. वाहन दरीबाहेर काढण्यात आले नाही.