शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अमरावतीतून एक हजारांवर वकिलांच्या सनदेची पडताळणी, वकील संघामार्फत पाठवले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 5:50 PM

अमरावती : वकिलांच्या सनदेच्या पडताळणीला मुदतवाढ मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाच्या पुढाकाराने १०८० वकिलांनी यासाठी अर्ज केले आहेत.

अमरावती : वकिलांच्या सनदेच्या पडताळणीला मुदतवाढ मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाच्या पुढाकाराने १०८० वकिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५६३ वकिलांपैकी उर्वरित १० टक्के वकिलांची सनद धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.न्यायालयात कार्यरत बोगस वकिलांना आळा बसावा, यासाठी सुप्रीम कोर्टाने बार कौन्सिल आॅफ इंडियाला वकिलांची सनद पडताळणीचे आदेश दिले होते. बार कौन्सिल आॅफ इंडियाने दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांपेक्षा अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्ज न केल्याची बाब समोर आली होती. मात्र, मुदतवाढीनंतर विविध शहरांतील वकील संघांनी सनद पडताळणीसाठी अर्ज पाठविल्यामुळे हे संकट टळले आहे.अमरावती जिल्हा वकील संघाने शिबिराच्या माध्यमातून वकिलांकडून अर्ज भरून घेतले. त्यापूर्वी नोटीस व मोबाइल संदेशद्वारे वकिलांना सूचना देऊन सनद पडताळणीबाबत सजग केले. न्यायालयात सराव करणा-या सर्व वकिलांचे अर्ज पाठविण्यात आले आहेत. ९० टक्के वकिलांचे अर्ज वकील संघातर्फे पाठविण्यात आले असून, दहा टक्के वकिलांमध्ये काही हयात नाहीत, तर काही जणांनी सराव सोडल्याचा निर्दशनास आले आहे. सद्यस्थितीत उर्वरित वकिलांच्या सनद पडताळणीसाठी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाने मुदतवाढीची मागणी केली असून, त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्हा वकील संघातर्फे सनद पडताळणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.प्रशांत देशपांडे,अध्यक्ष, अमरावती जिल्हा वकील संघ