लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. यादरम्यान काही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या. याविषयी तक्रार दाखल नाही. मात्र, आमच्यापर्यंतही त्या पोहोचल्यात. त्यामुळे या क्लिपची सत्यता पडताळूनच आचारसंहितेच्या कलमात गुन्हा दाखल करू, अशी स्पष्टोक्ती अमरावती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात तीन दिवसांपासून आॅडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी सबंधित या क्लिप असल्याचे यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे व या संभाषणादरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व युती उमेदवारांचे निरीक्षक यांच्यातील संवाद अन् यामध्ये बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख यांना देण्यात आलेल्या पैशांबाबत चर्चा व वाद, गर्भित धमकी आदी सर्व काही स्पष्टपणे ऐकू येत असल्याने या आॅडिओ क्लिपची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता सुरू आहे. आॅडिओ क्लिपचा एकंदर प्रकार हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप केला जात आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्यासी संवाद साधला असता, ही क्लीप त्यांच्यापर्यत पोहोचल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या क्लिपची सत्यता पडताळणी करणार आहे. त्यानंतर याविषयी गुन्हा दाखल करू, असे ते म्हणाले.समाज माध्यमांद्वारे होणाºया अपप्रचार व आचारसंहिता उल्लंघनाबाबतचा ‘एमसीएमसी’ हा कक्ष मतदान प्रक्रियेपश्चात नाही. मात्र, आचारसंहिता सुरू असल्याने या प्रकारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या क्लिपची सत्यता पडताळणीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.अनेक पैलू उलगडणारसध्या समाजमाध्यमाद्वारे व्हायरल झालेल्या आॅडीओ क्लिपच्या पडताळणीमध्ये यामागचे अनेक पैलू उलगडणार आहे. याला अनेक कंगोरे असल्याचे शैलेश नवाल म्हणाले. पहिल्या क्लिपमध्ये पाच कोटींचा उल्लेख आहे. या क्लिपची देखील सत्यता पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या क्लिपची देखील चौकशी करण्यात येवून आचारसंहिता भंग होत असल्यास गुन्हा दाखल करू असे नवाल म्हणाले.
‘त्या’ व्हायरल क्लिपची सत्यता पडताळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:09 AM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. यादरम्यान काही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या. याविषयी तक्रार ...
ठळक मुद्देआचारसंहितेच्या कलमांतर्गत कारवाई करू - शैलेश नवाल