लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिशय दुर्मीळ असलेला भारतीय अंडीखाऊ साप (इंडियन एग इटर) शुक्रवारी वलगाव मार्गावर मृतावस्थेत आढळून आला.जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर मैदानकर व त्यांचे सहकारी गौरव वºहाडे, डॉ. विपुल केचे, राहुल खांडे हे पहाटे भ्रमंतीसाठी गेले असता, त्यांना वलगाव रोडवरील रजनी मंगलम्नजीक एक पूर्ण वाढ झालेला साप वाहनाने चिरडलेल्या अवस्थेत आढळला.१३० वर्षांच्या कालावधीनंतर काही वर्षांपूर्वी नोंद झालेल्या या प्रजातीचा साप केवळ छोट्या पक्ष्यांची अंडी खाऊन जिवंत राहतो. या वैशिष्ट्यामुळे संख्या अत्यंत कमी आहे.१३० वर्षानंतर वर्धा जिल्ह्यात नोंदपक्ष्यांची अंडी खाद्य असणारी सापाची ही भारतातील एकमेव प्रजाती आहे. त्यामुळेच या सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष झालेल्या या सापाची २००५ मध्ये १३० वर्षानंतर प्रथमच वर्धा जिल्ह्यात नोंद झाली. विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात हा साप आढळून येतो. गुजरात, पश्चिम बंगालमध्ये या सापाच्या नोंदी असून, मध्यंतरी विदर्भातून या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची माहिती पुढे आली होती.
अतिदुर्मीळ ‘एग इटर’ आढळला मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:24 AM