रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : श्रीविठ्ठलाचा अडीच दिवसांचा मुक्काम असल्याच्या मान्यतेतून देवी रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूरला कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला दहीहंडी होते. त्यापूर्वी शनिवारी अलीकडे १० किलोमीटरवरील कुºहा येथे विविध ठिकाणांहून आलेल्या ४० पालख्यांचा दिमाखदार रिगण सोहळा पार पडला.कौंडण्यापूर जाणाºया सर्व पालख्या एक दिवस आधी शुक्रवारी कुºहा येथे दाखल झाल्या. गावातील लोकांकडे तसेच देवस्थानात त्यांचा मुक्काम होता. शनिवारी सकाळी ९ पासून सर्व पालख्या कुºहा-तिवसा रोडवर श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या बाजूला रिंगण सोहळा मैदानावर जमल्या. याप्रसंगी आयोजन समितीने महाप्रसादाचे वितरण केले. येथील रिंगण आटोपून दिंडीकºयांनी दुपारी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा घोष करीत कौंडण्यपूरकडे प्रस्थान केले.रिंगण सोहळ्याचे नववे वर्षकौंडण्यापुरात कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला दहीहंडी सोहळा असतो. प्रत्यक्ष पांडुरंग या दिवशी कौंडण्यापुरात मुक्कामी असल्यामुळे विदर्भ व इतर ठिकाणांहून ६० च्या वर दिंड्या आणि ३० ते ४० भजनी मंडळे दाखल होत असतात. या सर्व दिंड्यांचा रिंगण सोहळा कुºहानगरीत शनिवारी अकोला येथील हभप रंगराव टापरे महाराज यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यंदाचे हे नववे वर्ष होते. पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यापुरात कार्तिकीला भव्यदिव्य रिंगण सोहळा असावा, अशी वारकºयांची मनीषा होती. यामुळे कुºहा येथे आयोजन समिती मागील काही वर्षांपासून मनोहारी रिंगण सोहळा घडवून आणत आहे. या उत्सवामुळे गावकºयांमध्ये कमालीचा उत्साह होता. प्रत्येक घर पहाटेच्या सुमारास रांगोळ्या व दिव्यांनी सजले होते. रिंगण सोहळ्याच्या सभामंडपात पालख्या येताच वारकºयांचे स्वागत करण्यात करण्यात आले. गावातील नागरिक दिवसभर या सोहळ्यामुळे विठ्ठलाच्या भक्तिरसात दंग झाल्याचे चित्र होते. रिंगण सोहळ्याला आमदार यशोमती ठाकूर, हभप रंगराव टापरे महाराज, सुधीर दिवे, किरण पातूरकर, दिलीप निभोरकार, निवेदिता दिघडे, तिवसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लोकेश केने, सदस्य मंगेश भगोले, सरपंच विजयसिंह नाहाटे, संजय ठाकरे महाराज हे मान्यवर उपस्थित होते.यंदाच्या सोहळ्यात विदर्भातील ४० दिंड्यांचा सहभागरिंगण सोहळ्याकरिता ४० पालख्या व भजन मंडळे एकत्र आली. जय हनुमान संस्थान (आखतवाडा, जि. अकोला), श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान (बाळापूर), श्री वाल्मीकी मंडळ (चेचरवाडी), श्री हनुमान सांप्रदायिक भजनी मंडळ (शिंगणवाडी), श्री गोपाल महाराज संस्थान (मार्कंडा), श्रीक्षेत्र वारकरी संप्रदाय (नांदेड बु.), शारदा महिला मंडळ (नांदेड), मुक्त भजनी मंडळ (बाभळी), गजानन महाराज भक्ती मंडळ (हिवरखेड), श्री ज्ञानेश्वर महिला मंडळ (भातकुली), ज्ञानेश्वर माउली संस्थान (करजगाव) तसेच म्हातोडी, घातखेडा आदी ठिकाणांहून पालख्या सोहळ्यात सहभागी झाल्या.रांगोळीतून साकारली विठ्ठल-रुक्मिणीयावर्षी पहिल्यांदा रिंगण सोहळा मैदानावर विठ्ठल-रुक्मिणीची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. कुºहा येथील युवा शेतकरी अमोल ठाकरे यांनी आदल्या रात्री १० तासांच्या परिश्रमातून ही रांगोळी साकारली. आमदार ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. रांगोळीसह ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद अनेकांनी घेतला.
अवघी दुमदुमली कुºहानगरी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:38 PM