लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धुंवाधार पाऊस पडत असताना चपराशीपुºयातील मशिदीच्या मिनारला वीज भेदून गेल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. विजेमुळे मशिदीच्या मिनारला तडे गेले, सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. मात्र, वीज पडल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.सोमवारी विजेच्या गडगडाटासह पाऊस बरसला. शहरात जलमय झालेल्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विजेच्या प्रचंड मोठ्या आवाजामुळे शहरवासी भयभीत झाले होते. दरम्यानच चपराशीपुरा मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असताना सुमारे ५०० ते ६०० मुस्लिम बांधव मशिदीत उपस्थित होते. दरम्यान अचानक मशिदच्या मागील बाजूस असलेल्या गोल मिनारला वीज भेदून गेली. विजेमुळे मिनारला तडे गेले. सिमेंटचा काही भाग खाली कोसळला. वीज पडल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. नमाजाला उपस्थित नागरिकांचे मशिदीच्या मिनारकडे लक्ष वेधले गेले. चपराशीपुरा मार्गाने ये-जा करणाºया नागरिकांनीही गर्दी केली होती. यामुळे मार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
मशिदीच्या मिनारला भेदली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:23 PM
धुंवाधार पाऊस पडत असताना चपराशीपुºयातील मशिदीच्या मिनारला वीज भेदून गेल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देचपराशी पुºयातील घटना : नमाजावेळी घडली घटना