कर्नाटकात अल्पमतातील भाजपा सरकारला संधी देऊन बहुमतातील काँग्रेस व जेडीयू पक्षांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहर काँग्रेसद्वारा येथील इर्विन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना जलेबी भरवित आंनदोत्सव साजरा केला. यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके, माजीमंत्री सुरेंद्र भुयार, यशवंतराव शेरेकर, माजी आमदार सुलभा खोडके, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष किशोर बोरकर, प्रल्हादराव ठाकरे, पुष्पा बोंडे, किशोर शेळके, गणेश पाटील, विलास इंगोले, बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाहीचा विजय, कॉग्रेसचा जल्लोश :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:51 PM