लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी शासनाकडे केली जात आहे. महाराष्ट्रात राहून विकासाच्या बाबतीत विदर्भ अद्यापही माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. नागपूर करारानुसार सरकारकडून पालन होत नाही. या कराराप्रमाणे २३ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात विकासनिधी नाही. नोकºया मिळत नाही. विदर्भातील औद्योगिकरणाकडेही दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक संसाधनाची शोषण, सिंचन व शेती विकासाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. वेगळे विदर्भराज्य निर्माण झाल्याशिवाय विकास होऊच शकत नाही. त्यामुळे आता सरकारने तत्काळ वेगळे विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी आंदोलनादरम्यान केली आहे.या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, जिल्हाप्रमुख बंटी केजडीवाल, नंदू खेरडे, अमिता कुबडे, शेख कादर मन्सुरी, उज्ज्वला पांडे, प्रिया चक्रे, रंजना मामर्डे, कविता पवार, जुगल ओझा, विजय मोहोड, धनराज गोटे, गजानन भगत, सहदेव ढोके, साहेबराव इंगळे, विलास पवार, रियाज खान, राजेंद्र आगरकर यांच्या विदर्भवादी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:23 PM
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
ठळक मुद्देआंदोलन : वेगळया विदर्भ राज्याची मागणी