अमरावती : येथील पोलीस आयुक्तालयात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रणवीरसिंग राहल यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. ‘कुस्ती ट्रेनिंग प्रयोगात्मक’ या विषयात त्यांनी संशोधन केले.
आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व विदर्भ केसरी असलेले पोलीस शिपाई रणवीरसिंग राहल (ब.न.१९०९) यांनी सन २०१९ मध्ये टॉमी जोस यांच्या मार्गदर्शनात ‘कुस्ती ट्रेनिंग प्रयोगात्मक’ या विषयात अभ्यास करून प्रावीण्य प्राप्त केले. याद्वारे त्यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत महाराष्ट्र पोलीस विभागाचे नावलौकिक केले. त्यांच्या यशाबद्दल पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचीव प्रभाकरराव वैद्य, पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, डीसीपीई प्राचार्य के.के. देबनाथ यांच्यासह अनेक मान्यवरांनी सत्कार केला व त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.