शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 5:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ माघारला आहे. सर्वाधिक ९५.३ टक्के कोकण, नाशिक ९२.२, औरंगाबाद ७९.०, पुणे ७७.५ तर विदर्भातील अमरावती विभागात ६२.९ व नागपूर विभागात ६२.६ टक्केच पाऊस पडला आहे. पावसाच्या १२० पैकी ७२ दिवस संपले असताना सरासरीपेक्षा ३८ टक्के पाऊस ...

ठळक मुद्देधोक्याची घंटा अपेक्षित सरासरीच्या ६२ टक्केच पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ माघारला आहे. सर्वाधिक ९५.३ टक्के कोकण, नाशिक ९२.२, औरंगाबाद ७९.०, पुणे ७७.५ तर विदर्भातील अमरावती विभागात ६२.९ व नागपूर विभागात ६२.६ टक्केच पाऊस पडला आहे. पावसाच्या १२० पैकी ७२ दिवस संपले असताना सरासरीपेक्षा ३८ टक्के पाऊस कमी असल्याने पुढील काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्टपासून मध्यम व जोरदार स्वरूपात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हवामान विभागाचा अंदाज काही अंशी खरा ठरला. मात्र, अतिवृष्टी न होता हलक्या व मध्यम स्वरूपात पाऊस होत असल्याने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता पुरेशी वाढलेली नाही व धरणक्षेत्रात देखील दमदार पाऊस नसल्यामुळे प्रकल्प तहानलेलेच आहेत. विहिरीतील पाण्याची पातळी वाढली नसल्याने यंदाचा रबी हंगाम देखील बाधित होणार आहे.एक जून ते २१ आॅगस्ट या कालावधीत अमरावती विभागात ५५७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३५० मिमी पाऊस पडला. याविभागात जून महिन्यात १५४ मिमी सरासरी अपेक्षित असताना १३८ मिमी, जुलै महिन्यात सरासरी २६१ मिमी सरासरीची गरज असताना १४७ मिमी व २१ आॅगस्टपर्यंत १४२ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त ६५ मिमी पााऊस पडला आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ३७१.४ मिमी म्हणजेच ८०.२ टक्के, अकोला ३२७.८ मिमी ६६.९ टक्के, वाशिम ४२२.७ मिमी ७४.९ टक्के, अमरावती ३३६.५ मिमी ५८.९ टक्के तर सर्वात कमी ३२२.१ मिमी म्हणजेच ४९.७ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला आहे. आग्नेय विदर्भ व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

एक जून ते २१ आॅगस्ट दरम्यान पावसाची स्थिती* अमरावती विभागात ५५७.४ मिमी पावासाची सरासरी अपेक्षित असताना ३५०.८ मिमी पाऊस पडला. ही ६२.९ टक्केवारी आहे. एकूण ५२५.१ मिमी पाऊस पडला. ही ६२.६ टक्केवारी आहे.