इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.विदर्भात साधारणत: ८ ते ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची परंपरा आहे. रोहिणी नक्षत्रात शेती मशागतीची कामे आटपून ७ जूनला आरंभ होणाऱ्या मृग नक्षत्रात कपाशी पिकाची लागवण करण्यास शेती सज्ज ठेवली जाते. मात्र, पर्यावरणीय बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने पीक उत्पादनासह चारापाण्यावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. सन २००४ पासून २०१४ पर्यंतचा आढावा घेतला असता, १९ जून २०१४ रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हा अल्प कालावधीची पिके मूंग, उडीद, ज्वारी, बाजरा यांची पेरणी शेतकऱ्यांना टाळावी लागली होती. केवळ सोयाबीन, तूर व कपाशी पिके घेण्यात आली. यंदा २२ जूनला मान्सून धडकल्याने जमिनीतील उष्णता कमी होण्याची वाट पाहण्यात हा महिना निघणार आहे. त्यामुळे जुलैमध्येच खºया अर्थाने पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.१९५९ मध्ये २९ जूनला झाले होते आगमनसन १९५९ साली २९ जून रोजी मान्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. आजवरच्या इतिहासातील हे सगळ्यात उशिरा झालेले आगमन ठरले आहे. सन १९७२ मध्ये जरी दुष्काळ पडला असला तरी मान्सूचे आगमन आधीच झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.४८ तासांत पाऊसछत्तीसगड आणि जवळच्या क्षेत्रावर असलेल्या चक्रीय वात स्थितीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ४८ तासांमध्ये मान्सून मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ व्यापणार असल्याची माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम!काही दिवस पावसाचा आनंद मिळणार आहे. मात्र, पुढल्या आठवड्याच्या मधातच मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात मान्सूनला उशीर; दशकाचा रेकॉर्ड तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:47 AM
विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.
ठळक मुद्दे२०१४ मध्ये १९ जून रोजी विदर्भात दाखलचक्रीय वात स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार