ऑनलाईन लोकमतअमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार गुरूवार १ मार्च रोजी दुपारी १ वाजता स्थानिक इर्विन चौकात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनांनी शैक्षणिक डिग्रीच्या प्रतिकात्मक कॉपी जाळून सरकारचे लक्ष वेधले. केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली.दिवसेदिवस उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र, उच्च विद्याविभूषितांना नोकºया नाहीत. भाजप सरकारने निवडणुकीत बेरोजगारांना काम देण्याची घोषणा केली. मात्र, अंमलात आणली नसल्याचा आरोप समितीचे अमोल भिसेकर यांनी केला. यावेळी आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राजेंद्र आगरकर,सुभाष धोटे, प्रवीण भस्मे, महेश देशमुख, नंदकिशोर शेरे, रजंना मामर्डे, अरूण साकोरे, नागेश डोरलीकर, अज्जू भाई, गोपाल प्रधान, सतीश प्रेमलवार आदी उपस्थित होते.चांदूररेल्वेत शासनाचा निषेधशेकडो तरुणांनी हाताला काम न मिळाल्याने शासनविरोधी घोषणा देत शैक्षणिक पदवीचे दहन केले. विदर्भविरोधी नीतीचासुद्धा निषेध नोंदविला. यावेळी आशिष वानखडे, अजय बानाईत, ओमप्रकाश मानकर, सुधीर डोंगरे, सुशील कचवे, पवन महाजन, रोशन भोयर, संदीप भगत, सारंग राऊत, शुभम लंगडे, सुधाकर कांबळे, विजय डोंगरे, गजानन राजूरकर, ललित सदाफळे, सौरभ होले, अनिकेत घाटोळ आदी उपस्थित होते. चांदूर रेल्वेच्या एसडीओंना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे डिग्री जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:11 AM
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार गुरूवार १ मार्च रोजी दुपारी १ वाजता स्थानिक इर्विन चौकात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधले : केंद्र, राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध