शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, कॉरिडोरअभावी वन्यपशूंची नागरी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 4:20 PM

जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अमरावती : जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघाने माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या ९० टक्के घटना जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावांच्या सीमेवर झाल्या आहेत.वाघांच्या अधिवासात मानवी समूहाकडून होणा-या अतिक्रमणामुळे त्यांचे अधिवास असुरक्षित झाले आहेत. यंदा पाऊस कमी पडला. जंगलातील नदी-नाल्यांना अपुरे पाणी असल्याने वन्यपशू पाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये धाव घेत असल्याचे चित्र आहे. जंगलालगतची गावे जंगलावर अवलंबून असल्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात आणि जंगलालगतच्या गावांत प्रवेश करतात. त्याठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवतो. अधिकांश घटनांमध्ये वयात येणा-या वाघानेच हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर हा वाघ मृतदेह खातसुद्धा नाही. हे प्रमाण फार कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जंगलाशेजारच्या रहिवाशांसाठी वनविभागाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, या योजनांचा लाभ आदिवासींसह अन्य समूहांना मिळत नसल्याची ओरड आहे. नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात सोमवार २ आॅक्टोबर २०१७ रोजी वरूड तालुक्यातील शहापूर शेतशिवारात गंगोत्री हिरालाल नवडे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या आदिवासीबहुल पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव या तिन्ही गावांत नरभक्षक वाघिणीच्या भीतीने दस-याला सोने देण्याची ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.ब्रह्मपुरी (चंद्रपूर) तालुक्यातील गोगाव येथे रविवार १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेतावरून परतणा-या नामदेव नन्नावरे नामक शेतक-यावर वाघाने हल्ला चढविला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्षात वाढ झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. ही बाब वनविभागासाठी अतिशय चिंतनीय असून ब-याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यूसन २०१६ मध्ये १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ४७ वाघ, ३२ वाघीण आणि २३ प्रकरणांत वाघ होता की वाघीण, हे कळलेच नाही. यातील ३५ मृत्यू अनैसर्गिक, ४३ नैसर्गिक आणि २४ प्रकरणांत मृत्युची  कारणेच कळली नाहीत. सन २०१५च्या तुलनेत सन २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूची टक्केवारी देशात १४५ च्या वर वाढल्याचे ‘क्लॉ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

वाघांच्या मृत्यूची टक्केवारीजानेवारी ते मार्च २०१६- २८.४३ टक्केएप्रिल ते जून २०१६- २९.४१ टक्केजून ते सप्टेंबर २०१६- २१ टक्केआॅक्टोबर ते डिसेंबर २०१६- २१.५६ टक्के

वाघांचे वय आणि मृत्यूची टक्केवारीएक ते तीन वर्षे- २७.४५ टक्केचार ते नऊ वर्षे- ३०.३९ टक्केदहा वर्षांवरील- १९.६ टक्केवयांची माहिती नाही- २२.५४ टक्के