शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

विदर्भाचे नंदनवन हरवले धुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:39 PM

विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे अखेर एक महिन्यानंतर धुके पसरले आणि पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहता पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

चिखलदरा : विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे अखेर एक महिन्यानंतर धुके पसरले आणि पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहता पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.मान्सूनने यावर्षी तब्बल एक महिना उशिरा हजेरी लावल्याचा फटका राज्यभरातील सर्व पर्यटनस्थळांसह चिखलदऱ्यालाही बसला. मेळघाटात दरवर्षी ७ जूनपूर्वीच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र चांगलीच दांडी मारली. अखेर उशिरा का होईना, मागील चार दिवसांपासून मेळघाटात कुठे मुसळधार तर कुठे पावसाची रिपरीप सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची पावले चिखलदरा पर्यटनस्थळांकडे आपसुक वळतात. पांढरे शुभ्र दाट धुके कोसळणाºया मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेतात. पावसाने संततधार लावल्यास येथील उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि नदी-नाले खळखळून वाहायला सुरुवात होणार आहे.तीन हजारांवर पर्यटकांची हजेरीउन्हाळ्यात चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पर्यटकांनीही या स्थळाकडे पाठ फिरविली होती. शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस पाहता तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. त्यातूनच चिखलदारा नगरपालिकेला पर्यटक कर रुपाने १५ हजार रुपये प्राप्त झाले. येत्या काही दिवसांत या पर्यटन स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे.दिवसा लागलेत वाहनांचे दिवेचार दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर पांढºया शुभ्र दाट धुक्याची चादर आंथरली आहे. त्यामुळे दुचाकी आणि मोठ्या वाहनधारकांना दिवसा वाहनांचे दिवे सुरू करून प्रवास करावा लागत आहे.