शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

विदर्भाचे नंदनवन पावसात माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:23 PM

विदर्भाची चेरापुंजी.. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असणारे चिखलदरा यंदा पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात माघारले आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ३२ टक्क्यांची तूट गतवर्षीच्या तुलनेत ७७६ मिमी पाऊस कमी

अमरावती : विदर्भाची चेरापुंजी.. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असणारे चिखलदरा यंदा पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात माघारले आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट आहे. टक्केवारीत चिखलदरा १४ तालुक्यांत १० व्या स्थानी आहे. साहजीकच याचा थेट परिणाम पर्यटकांवर झाला आहे. यंदा तुरळक दिवस वगळता चिखलदºयाने धुक्याची चादर पांघरलीच नाही.जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस चिखलदºयात पडतो. एक जून ते ३० सप्टेंबर या पावसाच्या दिवसांत येथे १५२६ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे.तर ३० आॅगस्ट पर्यत ११८५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. ही ६३ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ५३ टक्के इतका पाऊस आतापर्यंत पडला आहे. याउलट मागील वर्षी या तारखेला १२४१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७६६ मिमी पाऊस कमी पडला आहे.मेळघाटात पावसाची दुसरी ओळख असनारा धारणी तालुका देखिल यंदा पावसाच्या सरासरीत माघारला आहे. आज तारखेपर्यत पावसाची ११८५ सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५८७.९ मिमी पाऊस पडला. ही ६३.२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १०८८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदा ५००.५ मिमी पाऊस जास्त होता.तिवसा तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊसअपेक्षित सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ८३.१ टक्के पाऊस तिवसा तालुक्यात पडला आहे. चांदूर रेल्वे ८०.७, वरूड ७९.८, मोर्शी ८४.४, चांदूर बाजार ७३.२, नांदगाव खंडेश्वर ७१.३, धामणगाव रेल्वे ७०.८, दर्यापूर ६८.२, अमरावती ६४.३, चिखलदरा ६३.६, भातकुली व धारणी ६२.२, अचलपूर ५७.७ तर सर्वात कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.