रमेश डेडवाल
अकोला, दि. १९ - अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात सातपुडा पर्वतरांगामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. घनदाट जंगलाने वेढलेला हा भाग जैवविविधतेने नटलेला असून, अनेक वन्यप्राण्यांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. या वनराईमध्ये सिपना नदीच्या काठावर असलेले कोलकाज या परिसरात बांधलेल्या विश्रामगृहाचीही नोंद इतिहासात अजरामर झाली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या परिसराला केवळ भेटच दिली नाही तर येथील विश्राम गृहावर ऐशींच्या दशकात मुक्काम केला होता.
कोलकाजच्या निरव शातंतेला केवळ सिपना नदीचा खळखळाट अन् पक्षांचा किलकिलाटच भंग करू शकतो. या विश्रामगृहाच्या प्रांगणात उभे राहिले तर खालून वाहणारी नदी जुण काही तुम्हाला भेटायला आली असा भास होतो. नदीचे पात्र येथे अर्धवर्तुळाकार झाले असून हा परिसर म्हणजे निसर्गाचे अलौकीक देणं आहे. येथे असलेल्या विश्राम गृहामध्ये सिपना नावाचा सुट असून याच सुटमध्ये इंदिरागांधी यांनी विश्राम घेतला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमा भागात सातपुडा पर्वरांगाांमध्ये १६७७ चौरस किमी क्षेत्रात मेळघाट पसरलेला आहे. प्रोटेक्ट टायगर अंतर्गत १९७४ मध्ये या भागाला वाघांसाठी संरक्षीत क्षेत्र घोषीत करण्यात आले. मेळघाटात वाघ, बिबट, कोल्हा, सांबर, चितळ, काळविट, उडणारी खार, अजगर, माकडे असे विविध वन्यप्राी आढळून येतात. अस्वलअतीघनदाट जंगलाने व्यापलेल्या मेळघाट हा खांडू, खापरा, सिपना, घाडगा आणि डोलर या पाच नद्यांचा पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. या पाचही नद्या तापी नदीला मिळतात. मेळघाटात कोरकु, गोंड, निहाल, बलाई, गोलन, गवळी, हल्बी, वंजारी आदी आदिवासी जमातीचे लोक वास्तव्यास आहेत.