शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 

By गणेश वासनिक | Published: November 18, 2024 9:25 AM

Achalpur Vidhan Sabha 2024 Election: यंदा अचलपूर मतदार संघात प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह एकूण २२ जण रिंगणात आहे.

गणेश वासनिकअमरावती :  अचलपूर हे ऐतिहासिक प्राचीन शहर आहे. संत गुलाबराव महाराज, बहिरमची प्रसिद्ध यात्रा, अष्टमासिद्धी, इंग्रजकालीन जिल्हा आणि आज नव्याने जिल्हा निर्मितीची मागणी अशी अचलपूर विधानसभा क्षेत्राची ओळख ठरली आहे. मात्र सलग चारवेळा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत आपली छाप सोडणारे बच्चू कडू हे आता पाचव्यांदा निवडणुकीच्या सामोरे जात आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सहकार नेते अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी बच्चू कडूंपुढे आव्हान उभे केले आहे. 

यंदा अचलपूर मतदार संघात प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह एकूण २२ जण रिंगणात आहे.  आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री तर महायुती सरकारात  दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद हे बच्चू कडू यांच्या रूपाने अचलपूरला मिळाले आहे. बच्चू कडू आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यात काट्याची टक्कर आहे. कुणबी,दलित, मुस्लीम, बारी, तेली, माळी अशा जाती-धर्माच्या मतदारांचे प्राबल्य आहे. 

२०१९ मध्ये काय घडले?

बच्चू कडू प्रहार (विजयी)८१,२५२ मते

बबलू देशमुख, काँग्रेस७२,८५६ मते

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

- बंद पडलेली फिनले मिल्स सुरू करणे, शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण आणि अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी

- शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ही अचलपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची प्रमुख मागणी.

- भाजपने प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिल्याने तिकीटचे प्रमुख दावेदार ठाकूर प्रमोदसिंह गडरेल यांची उमेदवारी कायम आहे.

- सलग चौथ्यांदा आमदारकीचा विक्रम नोंदविणारे बच्चू कडू यांच्याबाबत ‘ॲन्टी इन्कमबंशी’ आहे. भाजप आणि काँग्रेस ती ‘कॅश’ करण्याची रणनीती आखत आहे. 

- बबलू देशमुख यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास टाकला असून त्यावर ते खरे उतरताना त्यांच्या प्रचाराच्या रणनितीवरून दिसत आहे. त्यांचा छुपा अजेंडा मतदारांना आकर्षित करताना दिसतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४achalpur-acअचलपूरBacchu Kaduबच्चू कडूcongressकाँग्रेस