शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ तंत्रज्ञानाअभावी भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ हे बिरूद संत्रा उत्पादकांसाठी उभारल्या न गेलेल्या तंत्रज्ञानाअभावी तकलादू ठरले आहे. संत्रा उत्पादकांचा स्वबळावर उपाययोजना करून संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरू असला तरी फळाला परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने उत्पादक डबघाईस आले आहे. संत्रा साठवणुकीकरिता शीतगृहे आणि प्रक्रिया केंद्र नाही. याशिवाय येथे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र ...

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांची करुण कहाणी : लिंबूवर्गीय संशोधन केंद्र निकडीचे

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ हे बिरूद संत्रा उत्पादकांसाठी उभारल्या न गेलेल्या तंत्रज्ञानाअभावी तकलादू ठरले आहे. संत्रा उत्पादकांचा स्वबळावर उपाययोजना करून संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरू असला तरी फळाला परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने उत्पादक डबघाईस आले आहे. संत्रा साठवणुकीकरिता शीतगृहे आणि प्रक्रिया केंद्र नाही. याशिवाय येथे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र असणे काळाची गरज झाली आहे.वरुड तालुक्यात २१ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा आहे. सन १९४५ पासून संत्रा लागवडीला परिसरात सुरुवात झाली. सर्वप्रथम १९५७ मध्ये सहकारी तत्त्वावर शेंदूरजनाघाट येथे ज्यूस फॅक्टरी ‘अमरावती जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शेंदूरजनाघाट’ नावाने स्वबळावर उभी करण्यात आली. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० रोजी इमारतीच्या भूमिपूजनाची कोनशिला रोवण्यात आली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, राजाश्रय मिळाला नसल्याने पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी झाली आणि मध्यवर्ती बँकेलाच ही जागा विकावी लागली. वरूडमध्ये सोपॅक ही खासगी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली, तीही बंद पडली. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासनाचा नोगा प्रकल्पही सुरू होताच बंद पडला.यशवंतराव चव्हाण हे वरुड भागात महात्मा फुले महाविद्यालयाच्या भूमिपूजनाकरिता आले असता, परिसरातील संत्राउत्पादन तसेच कृषिवैभव पाहून ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून संबोधले होते. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्राबागा नेस्तनाबूत आणि उत्पादक डबघाईस आले आहेत.संत्रा फळापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच टरफलापासून डिटर्जंट पावडर बनविली जाऊ शकते. देशी-विदेशी दारूची वायनरी होऊ शकते. परंतु, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ना ज्यूस फॅक्टरी, ना वायनरी सुरू होऊ शकली. संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली देशी दारूच विकली जाईल का, हादेखील प्रश्न आहे. याशिवाय शेतीव्यतिरिक्त राबणारे हजारो हातांना काम मिंळाले नाही.शीतगृहासह ग्रेडिंग आणि व्हॅक्सिनेशनचा प्रयत्न !दिवंगत वासुदेव देशपांडे यांच्या पुढाकाराने आॅरेंज सिट्रस किंग या नावाने शीतगृह आणि व्हॅक्सिनेशन प्रकल्प सुरू करून हॉलंड, दुबईसह आदी अरब राष्ट्रात येथून संत्र्याचे कंटेनर भरून गेले. सहकारी तत्त्वावरची ही संस्था डबघाईस आल्यानंतर बाजार समितीचे तत्कालीन सभापती रमेशपंत वडस्कर आणि नरेंद्र चोरे यांनी ही यंत्रणा खरेदी करून शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य भाव आणि साठवणुकीसाठी प्रयत्न केले. अशा एक ना अनेक प्रकल्प सहकारी तत्त्वावर उभे राहिले आणि कोलमडले, हे वास्तव आहे.राज्यातील पहिला संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प वरूडमध्ये उभारला जाईल. त्यामुळे येथील शेतकºयांना सुगीचे दिवस येतील. मोर्शीत संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे ब्रँडिंग केले जाईल, अशी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅक्टोबर २०१५ मध्ये संत्रा महोत्सवादरम्यान केली होती. या प्रकल्पाची आता कोठेही वाच्यता केली जात नाही, तर उलट हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे सांगण्यात येते.

संत्रा डिहायड्रेशन प्रकल्पाचे काय?राज्यातील पहिला संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प वरूडमध्ये उभारला जाईल. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. मोर्शीत संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे ब्रँडिंग केले जाईल, अशी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅक्टोबर २०१५ मध्ये संत्रा महोत्सवादरम्यान केली होती. या प्रकल्पाची आता कोठेही वाच्यता केली जात नाही, तर उलट हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे सांगण्यात येते.