लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील मिर्चापूर, अमदाबाद शिवारात बिबट्याचे दर्शन नित्याने होत असून, महालक्ष्मीच्या दिवशी अमदाबाद बिबट्याने दर्शन दिले, तर मंगळवारी रात्रीसुद्धा एका शेतकऱ्याला आढळल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.मिर्चापूर परिसराच्या जंगलात वृक्षाचे प्रमाण अधिक असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे. परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहे. याची माहिती ही वार्ता गावांत पसरल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करताना बिबट्याची भीती सतावत आहे. नागरिक कामासाठी जाण्यास धजावत नाही. आगाऊ रोजंदारी देण्याचे कबूल करूनदेखील शेतमजूर कामावर येत नसल्याचे चित्र आहे. उन्हाच्या तीव्रतेने बिबट जंगलाबाहेर येत आहे. वनविभागाच्यावतीने याठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.शेतकऱ्याची उडाली भंबेरीअमदाबाद शिवारातील शेतकरी सतीष गावंडे हे शेतातून घरी येताना रात्री ७ च्या सुमारास अचानक बिबट त्यांच्या दृष्टीस पडले. परंतु, त्यांच्यात अधिक अंतर असल्याने ते बळी पडू शकले नसले तरी बिबट पाहून त्यांची भंबेरी उडाली होती. बिबट दिसताक्षणी त्याची पळताभुई थोडी अशी स्थिती झाली होती.बिबट्याच्या भीतीने परिसर सामसूमदिवसाढवळ्या व सायंकाळी बिबट मानवी वस्तीकडे चाल करीत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी या परिसरात फिरकत नसल्याचे चित्र आहे. तसेच गुराखी या भागात गुरे चराईकरितासुद्धा नेत नसल्याने हा परिसर सामसूम झाला आहे.आम्ही रात्र गस्त सुरू केली आहे. जंगलात कॅमेरा लावला असून, आम्हाला बिबट दृष्टीस पडलेला नाही. गावातील नागरिकांसमक्ष गस्त केली. त्यामुळे नागरिकांनी मनात भीती बागळू नये, आम्हाला बिबट दिसला नाही.- व्ही.टी. मापारी,वनपाल तिवसा
मिर्चापूर, अमदाबाद येथे बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:16 PM
तालुक्यातील मिर्चापूर, अमदाबाद शिवारात बिबट्याचे दर्शन नित्याने होत असून, महालक्ष्मीच्या दिवशी अमदाबाद बिबट्याने दर्शन दिले, तर मंगळवारी रात्रीसुद्धा एका शेतकऱ्याला आढळल्यामुळे शेतकºयांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.
ठळक मुद्देनागरिकांत दहशत : महालक्ष्मीच्या दिवशी बिबट अमदाबाद