शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

गावकऱ्यांनी साकारले पाणीदार गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 9:40 PM

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : पिंपळगाव बैनाईचा राज्यातील सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता आमिरखान, किरण राव, चित्रपट निर्माते आषुतोष गोवारीकर, अभिनेते गिरीश कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये या गावाला अतिरिक्त पुरस्कार देण्यात येणार आहे.स्पर्धेत राज्यस्तरावर १६ गावात निवड झालेले अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (बैनाई) हे एकमेव गाव आहे. या स्पर्धेदरम्यान या गावाने १३४ शोषखड्डे, २४०० झाडांची रोपवाटिका, ९ हजार घनमिटरचे काम गावकऱ्यांच्या श्रमदानाद्वारे तसेच ९० हजार घनमीटर काम यंत्राद्वारे करण्यात आले. यात ३८ शेततळे, १५०० मीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सुमारे ३६०० मीटर लांबीचे शेतातील बांध इत्यादी कामाचा समावेश आहे. या कामाद्वारे गावाने १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्याची क्षमता केवळ ४५ दिवसांत निर्माण केली. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंतच्या कालावधीत सातत्याने या गावातील गावकºयांनी एकजुटीने श्रमदान करून ही किमया घडविली. उल्लखनीय बाब म्हणजे या गावातील मुस्लीम बांधवांनी प्रार्थनस्थळावर शोषखड्डा खोदून वाहून जाणारे पाणी अडविले तसेच या समाजातील महिला देखील श्रमदानात अग्रेसर राहिल्या. यानिमित्त विविध धर्माची व समाजाची मंडळी एकजुटीने या कामाला लागल्याने गावात एकोपा निर्माण झाला आह.े.पाणी फाऊंडेशनमधील कामाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला एकोपा व वाढलेली भूजल पातळी ही खरी जमेची बाजू आहे.- शरयू अजय पंडीतसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई हे गाव राज्यस्तरावर झळकले असून यापुढेही गावकºयांच्या सहकार्यातून या कार्याचे सातत्य आम्ही कायम ठेवू.- श्रीकृष्ण राऊतउपसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई, मोखड, काजना व तालुक्यातील इतर २३ गावकºयांनाही श्रमदानातून पाणीदार गावे साकारली. आता तालुक्यातील इतर गावांनीसुद्धा कित्ता गिरवावा.- मनोज लोणारकर,तहसीलदार