कॉमन
फोटो पी २८ चिखलदरा
चिखलदरा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला रविवारी सायंकाळी ५ वाजता धारणी येथून चिखलदरा येथील शासकीय निवासस्थान व गुगामल वन्यजीव विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी तगडा पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात धारणी न्यायालयाने विनोद शिवकुमार बाला याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागात विनोद शिवकुमार हा उपवनसंरक्षक पदावर कार्यरत होता. चिखलदरा येथे कार्यालय व त्याचे शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे आत्महत्या प्रकरणात संबंधित कागदपत्रांच्या तपासणीसाठी व पुढील चौकशीसाठी धारणी येथून चिखलदरा येथे आणण्यात आले.
धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, सपोनि प्रशांत गिते, चिखलदराचे ठाणेदार अशोक वाढिवे आदींनी त्याला येथे आणले.
बॉक्स
काही वस्तू जप्त
आरोपी विनोद शिवकुमार याला रविवारी येथून त्याच्या शासकीय निवासस्थानात आणून तेथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे पथक गुगामल वन्यजीव विभागात सर्व कागदपत्रांची चौकशी करून बयाण नोंदवित होते. वृत्त लिहिस्तोवर ही चौकशी सुरू होती. शासकीय बंगल्यातून काही वस्तू जप्त केल्याची माहिती आहे.