विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करा, युवक कॉंगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 08:35 PM2019-01-12T20:35:26+5:302019-01-12T20:35:44+5:30

युवक काँग्रेसच्यावतीने  ११ जानेवारी रोजी  विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

Vinod Tawde to be removed as Education Minister, Youth Congress demand | विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करा, युवक कॉंगेसची मागणी

विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करा, युवक कॉंगेसची मागणी

Next

मोर्शी (अमरावती) - युवक काँग्रेसच्यावतीने  ११ जानेवारी रोजी  विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार विठ्ल वंजारी यांनी स्विकारले आहे. तसेच युवक कॉग्रेसला येथील शेतकरी स्वाभिमान संघटनेचे तालुका महाविध्यालयीन प्रमुख  वैभव फुके यांचा पांठिबा मिळाला आहे.

 काही दिवसाआधी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे शिक्षण मंत्री यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षण मंत्री यांच्या म्हणण्यावरून विद्यार्थ्यांनी काही प्रश्न केले असता त्याच विद्याथार्ला शिक्षण मंत्री यांनी अटक करण्याचे आदेश पोलीस यांना दिले. अश्या अडाणी पणाचा प्रत्यय देणा-या शिक्षण मंत्र्याची तत्काळ हकालपट्टी करावी. अन्यथा तालुक्यातील सर्व विद्यार्थी सोबत घेऊन युवक कॉग्रेसच्या वतीने तीव्र आदोलन छेडण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला ११ जानेवारीला एका निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी भूषण सुभाषराव राऊत युवक कॉग्रेस मोर्शी, वसीम अकरम कुरेशी कॉ.जि.महासचिव,नितीन पन्नासे न.प.मोर्शी, योगेश गनेखर न.प.मोर्शी, विक्रम राउत उपाध्यक्ष मोर्शी, प्रफुल दरवाई यु.कॉ.उपाध्यक्ष मोर्शी, शुभम पाचघरे यु.क्रॉ. उपाध्यक्ष मोर्शी, योगेश कडू यु.क्रॉ.उ.मोर्शी, सौरभ कंगाले यु.क्रॉ.उपाध्यक्ष मोर्शी, ईश्वर श्रीसाठ, राहील खान अल्पसंख्याक महासचिव, जावेद पठाण अ.शहरअध्यक्ष, शारिक खान अ.उपाध्यक्ष, शेख फहीम अ.सचिव, गोलू शेख यु.क्रॉ. उपाध्यक्ष, प्रदीप इंगळे, नितेश लेंडे शहरप्रमुख, सागर ठाकरे नगर सेवक, निलेश लायदे वि.स.म.स.मोर्शी, आकाश ढोले, शुभम तिडके, प्रज्वल गणगणे गौरव खेरकर, इसरार भाई, सौरभ कानबाले, हेमंत प्ररतेती यांनी निषेद नोंदविला.

Web Title: Vinod Tawde to be removed as Education Minister, Youth Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.