मुकेश साहेबरावजी डोंगरे (४५ रा. महात्मा फुलेनगर, नवसारी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांचे पथक शुक्रवारी रात्री चित्रा चौकात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मुकेश डोंगरेच्या पानटपरीवर ग्राहक आढळून आले. त्याने वेळ मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी मुकेश डोंगरेविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000
अमरनगरातून गोवंश पळविले
अमरावती : अज्ञात चोरांनी अमरनगरातून ३० हजार रुपये किमतीची एक गाय चोरून नेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. आनंद प्रवीण वरूडकर (२३ रा. अमरनगर) यांनी घराच्या आवारात गिर जातीची गाय बांधून ठेवली होती. २ एप्रिल रोजी त्यांना अंगणात गाय दिसली नाही. चारचाकी वाहनात आलेल्या चाैघांनी ती गाय चोरून नेल्याचे आढळून आले. आनंद वरूडकरने घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
0000000000000000
व्हाईट कॅस्टल बारवर एक्साईजची धाड
अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश
अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मोर्शी रोड स्थित व्हॉईट कॅस्टल बारवर धाड टाकली. त्यावेळी तेथे अवैध दारूची विक्री होत असल्याचे आढळून आले. घटनेची तक्रार एक्साईजचे दुय्यम निरीक्षक संजय उत्तम केवट (४८) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दीपक रामरख्यानी (५१ रा. रामपुरी कॅम्प व अभिषेक प्रदीप मिश्रा (२० रा. अर्जुननगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
तोंडाला मास्क न लावता सुरू होता व्यवसाय
एक्साईज अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता, व्हॉईट कॅस्टल बारमध्ये प्रथम अवैध दारूची विक्री होत असल्याचे आढळून आले. तसेच कोरोना प्रतिबंधाच्या नियमावलींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. दारू विक्रेता तोंडाला मास्क न लावता व्यवसाय करीत होता. यासोबत संचारबंदीच्या वेळ मर्यादेचे पालन बार संचालकाने केले नसल्याचे आढळून आले.