पान १
अमरावती : जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत तब्बल ९२ हजार वाहनचालकांनी वाहतूक नियमांचा भंग केला. त्यापोटी त्यांनी तब्बल ८५ लाख रुपयांचा दंडदेखील भरला. मात्र त्यानंतर वाहतूकीची शिस्त लागायला हवी ना, मात्र पुढचे पाढे पंचावन्न. ‘समोरच्याला ठेच, मागचा शहाणा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. मात्र, नियम मोडणार्या वाहनचालकांनी ती लागू होत नाही. या सात महिन्यात ९२ हजार वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांवर शिरजोरी केली आहे. अमरावती शहरात दिवसाकाठी सरासरी ५०० वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो. पोलिसांच्या नजरेतून सुटले ते वेगळेच.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील अनेक रस्तांचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, त्या सिमेंट रस्त्यावर संबंधित दुकानदारांची वाहने, त्यापुढे ग्राहकांची व त्यापुढे अतिक्रमणधारकांच्या हातगाडया. त्यामुळे सर्वाधिक कारवाई होते ती नो पार्किंग झोनमध्ये वाहने ठेवण्याची. शहरात बोटावर मोजण्याइतपत पार्किंग झोन आहेत. त्यामुळे कारवाई व दंड अशा दोन्ही पातळीवरची पोलिसांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे वास्तव आहे. शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. शहरातील तो आकडा सरासरी पाचशेच्या घरात आहे. मात्र सकाळी वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे बेदकारपणे वाहने हाकली जातात.
महिना प्रकरणे दंड
जानेवारी ११,२३६ : १२९०४००
फेब्रुवारी : ११४६३ : १९४८५००
मार्च : १४८०४ : १७६४४५०
एप्रिल : १३००० : १०२८६५०
मे : १५५२८ : ७५००००
जून : १४९३२ : १०१९२००
जुुलै : ११५०८ : ७२२०००
हे नियम मोडल्यास होतो दंड
हेल्मेटचा वापर न करणे, सिटबेल्ट न लावता वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, मोबाईल फोनचा वापर करणे, मालवाहू वाहनामध्ये प्रवासी वाहतूक, लाल सिग्नल जंप करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विनाइंशुरंस वाहन चालविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, अल्पवयीनांनी वाहन चालविणे, रॉंग साईड वाहन चालविणे, विना रिफ्लेक्टर, विनाटेल वाहने चालविणे
कोट
जानेवारी ते जुलै या कालावधीत ९२ हजार वाहनचालकांकडून ८५.२३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई निरंतर सुरू राहील. वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
विजय कुरळकर, पोलीस निरिक्षक
वाहतूक शाखा