शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘व्हीआयपी’ फाईलला फुटले पाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 10:12 PM

कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याच्या नियुक्ती फाईलला पाय फुटल्याचा धक्कादायक प्रकार सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) उघड झाला आहे. याबाबत केलेला खुलासासुद्धा धक्कादायक असून, फाईलच्या गोपनियतेबाबत जीएडी किती बिनधास्त आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित झाले आहे.

ठळक मुद्देमूळ दस्तऐवज जीएडीऐवजी बांधकामकडे : अधीक्षक दुर्गादास मिसाळ बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याच्या नियुक्ती फाईलला पाय फुटल्याचा धक्कादायक प्रकार सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) उघड झाला आहे. याबाबत केलेला खुलासासुद्धा धक्कादायक असून, फाईलच्या गोपनियतेबाबत जीएडी किती बिनधास्त आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित झाले आहे. ती महत्त्वपूर्ण फाईल अद्यापपर्यंत जीएडीला सापडलेली नाही.शहर अभियंत्यासह अन्य सेवानिवृत्त अभियंत्याच्या कंत्राटी नियुक्तीची फाईल जीएडीमध्ये असणे अभिप्रेत आहे. मात्र ती महत्त्वपूर्ण फाईल मागील चार महिन्यांपासून जीएडीत नसल्याची कबुली अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांनी दिली आहे. सदार यांचा कार्यकाळ केव्हा संपुष्टात येत आहे, अशी विचारणा केल्यानंतर सदारांच्या मुदतवाढीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ती फाईल कुठे याबाबतही अधीक्षकांनी अनभिज्ञता दर्शवित अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर सदार यांच्या मुदतवाढीची फाईल बांधकामकडून चालल्याने ती त्यांच्याकडेच असावी, अशी शक्यता मिसाळांनी व्यक्त केली. मात्र, फाईल कुठे? याबाबत ते ठामपणे सांगू शकले नाहीत. आस्थापना व कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचा संपूर्ण लेखाजोखा जीएडीत असणे अभिप्रेत आहे. कंत्राटी नियुक्ती, मुदतवाढ जीएडीकडून प्रस्तावित केल्या जातात. मात्र, जीवन सदारांसह जाधव, देशमुख, कुळकर्णीची नियुक्ती व मुदतवाढीचे दस्तावेज असलेली मूळ फाईल जीएडीतून गायब झाली आहे. त्यामुळे सदार यांना कोणत्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, हे मिसाळ सांगू शकले नाहीत. सदार यांना ८ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती जीएडीतील अन्य कर्मचाºयाने दिली.डाव कुणाचा?...: अभियंता जीवन सदार यांचा कंत्राटी कार्यकाळ ८ जून २०१८ ला संपूष्ठात येत आहे. जीएडीमधून गहाळ झालेल्या त्या फाईलमध्ये सदार यांची तीन वर्षापूर्वीच्या मुळ नियुक्तीपासून अन्य कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याचे दस्तावेज आहेत. सदार यांना पुन्हा घेण्याचा खटाटोप होण्याची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमिवर त्या महत्वपूर्ण फाईलकडे जीएडीने कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे.सदारांच्या मुदतवाढीबाबतची ती फाईल चार महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता-१ कडील कंत्राटी अभियंत्याने नेली होती. ती त्यांच्याकडेच असेल.- दुर्गादास मिसाळ,अधीक्षक, सामान्य प्रशासन