लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने शनिवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यत जिल्हास्तरीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता शिबिर येथील तेलाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.दिवसभर चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दीड हजार कार्यकर्ते एका छताखाली येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिबिराचे उदघाटन राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे राहतील. तर मार्गदर्शक म्हणून अ.भा. काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आमदार अब्दूल सत्तार यांच्यासह प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.आगामी निवडणुका लक्षात घेता या शिबिरात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जुने व जाणते निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्याना आमंत्रित केले आहे. सुमारे दीड हजारावर कार्यकर्ते या सहभागी होणार असल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले. शिबिरात काँग्रेसचे आजी- माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच तालुका काँग्रेसचे पदाधिकारी सरपंच, सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला काँग्रेसचे नेते येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुका काबीज करण्यासाठी मंथन वजा टीप्स देतील, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आर्वजून सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसजन एकवटले आहे.हे आहेत मुख्य वक्तेजिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या शनिवारी होत असलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षणाला सकाळच्या उदघाटनीय सत्रानंतर मुख्य वक्ते म्हणून मधूकर भावे, भालचंद्र मुणगेकर,माजी खासदार नाना पटोले आदी नेते कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसचे व्हिजन २०१९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:58 AM
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने शनिवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यत जिल्हास्तरीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता शिबिर ....
ठळक मुद्देबबलू देशमुख यांची माहिती : २४ ला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर