युवा स्वाभिमानचे आंदोलन : नियमित पाणी पुरवठ्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनेक भागात मागील काही दिवसापासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने संप्तत झालेल्या युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता भामरे यांना घागर भेट देवून रोष व्यक्त केला.स्थानिक बेलपूरा,गोपाल नगर,बडनेरा जुनी व नवी वस्ती, चवरे नगर, भीम टेकडी, सुशिलनगर, मायानगर, महादेवखोरी, बेनोडा, छागाणीनगर, पार्वतीनगर व इतरही भागात मागील आठवडाभरापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. उन्हाळयाचे दिवस असल्याने आता ग्रामिण भागातही पाठोपाठ शहरातही कृत्रिम पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी ३१ मे रोजी आ. रवी राणा यांच्या नेतुत्वात जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी सुरळीत पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या कार्यकारी अभियंता भामरे यांना युवा स्वाभिमानच्या महिला आघाडीने घागर भेट देवून पाणी समस्येकडे लक्ष वेधले. दरम्यान या विषयावर आ. रवी राणा यांनी कार्यकारी अभियंता भामरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आश्वासन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळीे सुमती ढोके,सपना ठाकूर, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, जया तेलखडे, रश्मी घुले, मिनल डकरे, हेमलता माहूलकर, आशिष कावरे,राजू हरणे, संजय हिंगासपूरे, राजू रोडगे आदी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंत्याला घागर भेट
By admin | Published: June 01, 2017 12:13 AM