आॅनलाईन लोकमतअमरावती : अपेक्षेनुरूप भाजपचे विवेक कलोती यांची स्थायी समिती सभापती म्हणून शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. १६ सदस्यीय स्थायी सभागृहात भाजपकडे नऊ सदस्य असल्याने निवडणुकीची केवळ औपचारिकता होती. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी कलोती यांना विजयी घोषित केले व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले.तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नवे स्थायी समिती सभापती निवडीसाठी शुक्रवारचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. भाजपच्या गटात असलेल्या युवा स्वाभिमानच्या सपना ठाकूर यांनी सभापतिपदासाठी इच्छा दर्शविल्याने थोडासा टिष्ट्वस्ट निर्माण झाला होता. मात्र, संख्याबळ न जुळल्याने त्यांनी नामांकन टाकण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. दरम्यान, शुक्रवारी ८.३० ते १०.३० या कालावधीत स्थायी समिती सभापतीसाठी नामांकन स्वीकृत करण्याची वेळ होती. त्यासाठी सपना ठाकूर, काँग्रेसचे बबलू शेखावत व भाजपचे गटनेते सुनील काळे यांनी दोन नामांकने उचल केली. मात्र, विहित वेळेत विवेक कलोती यांचाच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कलोती हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. अवघ्या १५ मिनिटांमध्ये ही निवड झाली. त्यानंतर भाजप व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कलोती यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा कलोतींचा घरातील सदस्य स्थायी समिती सदस्य म्हणून निवडून आला. स्थायीमधून बाहेर पडल्यानंतरही कलोतींचा स्थायीत पुनर्प्रवेश झाल्याने तेच सभापती होतील, हा कयास होता व त्यांच्या निवडीने तो खरा ठरला.खुल्या जीपमधून मिरवणूकमहापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, मावळते स्थायी सभापती तुषार भारतीय, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, सुनील काळे आदींनी अभिनंदन केल्यानंतर खुल्या जीपमधून कलोतींची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पुष्पवर्षाव करण्यात आला. डीजे आणि ताशाच्या तालावर भाजपाई रंगले. खुल्या जीपमध्ये किरण पातूरकर, रवींद्र खांडेकर यांची उपस्थिती होती. तुषार भारतीय यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली.कानठळ्या वाजवणारा डीजेपोलिसांच्या नाकावर टिच्चून कलोतींच्या विजयी मिरवणुकीत डीजे वाजवण्यात आला. सकाळी ११.१० ते ११.५० पर्यंत हा थयथयाट सुरू होता. डीजेच्या आवाजाने अधिकारी-कर्मचाºयांसह सर्वांच्या कानठळ्या बसल्या असताना शहर कोतवाली पोलिसांनी हटकले नाही. एरवी मिरवणुकीत आवाज थोडा वाढला की, पोलिसी दंडुका वापरला जातो. मात्र, प्रवेशद्वारावर कर्कश डीजे वाजत असताना त्यांना हटकण्याचे धाडस महापालिकेचे अधिकारीही करू शकले नाहीत.
स्थायी सभापतिपदी विवेक कलोती अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 11:32 PM
अपेक्षेनुरूप भाजपचे विवेक कलोती यांची स्थायी समिती सभापती म्हणून शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. १६ सदस्यीय स्थायी सभागृहात भाजपकडे नऊ सदस्य असल्याने निवडणुकीची केवळ औपचारिकता होती.
ठळक मुद्दे२६ वे स्थायी सभापती : जंगी मिरवणूक, पैशांची उधळण