अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रिक्त राहिलेल्या व निवडून आल्यावर राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या किमान ४० जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला.
कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात या पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, ही मतदार यादी पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत सहा महिने बाकी आहे, अशा ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांचा यामध्ये समावेश करू नये, असे आयोगाने बजावले आहे.
निवडणूक कार्यक्रमाकरिता १५ जानेवारी २०२१ रोजीची प्रारूप यादी राहणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीबाहेरील मतदार या यादीमध्ये समाविष्ट नाही ना, याची खात्री या यादीच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. याशिवाय दुबार नावे व मृत मतदारांची नावे वगळण्याबाबत यापूर्वीच्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय लेखनिकाच्या चुुकांची दुरुस्ती, दुसऱ्या प्रभागात चुकून अंतर्भूत झालेले मतदार याशिवाय संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नावे वगळण्यास आली असल्यास, अशा मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
बॉक्स
असा आहे कार्यक्रम
प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध : ११ फेब्रुवारी
हरकती व सूचना दाखल, सुनावणी : ११ ते १६ फेब्रुवारी
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी : १८ फेब्रुवारी
बॉक्स
या रिक्त जागांसाठी कार्यक्रम
अचलपूूर तालुक्यात ९, भातकुुली १, दर्यापूर ५, मोर्शी व वरूड २, धारणी ७ व चिखलदरा तालुक्यात ३ पदे रिक्त आहेत. याशिवाय दोन प्रभागांमध्ये निवडून आलेल्या ६ सदस्य तसेच २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या २१ जागांचा यामध्ये समावेश आहे.