पोटनिवडणूक : ५ ते १५ जुलैपर्यंत राहणार प्रक्रियालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा पंचायत समितीच्या रिक्त मोझरी गणाच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ते १५ जुलैदरम्यान मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आॅगस्ट महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.या गणाच्या सदस्या गौरी संजय देशमुख या वऱ्हा जिल्हा परिषद गटामधून विजयी झाल्यानंतर त्यांनी मोझरी गणाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या अनुषंगाने पोटनिवडणूक घेण्यासाठी आयोगाची तयारी सुरू आहे. या प्रक्रियेत संबंधित गणाच्या मतदार यादीमधील सर्व मतदार यादीत समसविष्ट आहेत व मतदार संघाबाहेरील मतदार यामध्ये समाविष्ट नाहीत, याची खात्री करण्यात येणार आहे. दुबार असलेली नावे वगळण्यात येनार आहेत. महाआॅनलाईन आज्ञावलीव्दारा प्रभाग निहाय मतदार यादीचे विभाजन करण्यात येणार आहेत. तसेच विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनावर निर्णय घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहे.असा आहे कार्यक्रमअस्तित्वातील यादी प्रसिद्ध करणे ५ जुलै, हरकती व सूचना दाखल करणे १० जुलै, यादी अधिप्रमाणित करणे १५ जुलै व अंतिम यादी प्रसिद्ध करणे १५ जुलै असा कार्यक्रम राहणार आहे.मल्हारा ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूकअचलपूर तालुक्यातील मल्हारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोहर शंकरराव जाधव यांचे निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या पदासाठी ७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या सभागृहात सात सदस्य आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने याविषयीचे पत्र दिले आहे.
मोझरी गणासाठी मतदारयादीचा कार्यक्रम
By admin | Published: June 25, 2017 12:03 AM