धारणीची नगरपंचायत निवडणूक : आता प्रतीक्षा अध्यक्ष निवडीचीश्यामकांत पाण्डेय धारणीधारणीतील पहिलीच नगरपंचायत अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरली. जिल्ह्यातील चार नगरपंचायतीत सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत मतदारांनी सुशिक्षित उमेदवारांना नाकारले. हा प्रकार लक्ष्मीदर्शनाचा योग जळून आल्याने झाल्याचे बोलले जाते.११७ उमेदवारांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात भाग घेतला होता. यात ३ डॉक्टर आणि १ वकिलाचा समावेश होता. उच्चशिक्षित उमेदवारांसमोर मुरलेले राजकारणी उभे होते. नागरिकांनी सुशिक्षितांना नाकारुन राजकारणाची पाळेमुळे जाणणाऱ्यांची आणि साम, दाम, दंड, भेदाचा वापर करणाऱ्यांना साथ दिली. आर्थिकदृष्ट्या संपन्न व नोकरीपेशांनी उमेदवारांना त्यांची पात्रता न पाहता मतदान झाले. आर्थिक आमिषाला बळी पडल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे आता भविष्यात उमेदवारांना योग्यतेसोबतच अर्थकारणाकडे लक्ष द्यावे लागेल, असा संदेश या निवडणुकीने दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दोन सख्ख्या भावांना उमेदवारी देऊन वाद ओढवून घेतला होता. प्रभाग क्र. १५ मधून मोठा भाऊ तर प्रभाग क्रमांक १४ मधून लहान भावाला दिलेली उमेदवारी सर्वाधिक चर्चेत होती. ‘करण-अर्जुन’ची जोडी म्हणून या दोघांची गावात ओळख आणि दोघेही माजी ग्रामपंचायत सदस्य. परंतु कामाची शैली व कार्यकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या या दोघा भावांना मतदारांनी त्यांनाविजयी केले. तर दुसरीकडे माजी मंत्री रामू पटेल यांच्या सूनबाई व मुलाने दोन वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी भरुनही विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. आता सगळ्यांचे लक्ष अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. ६ नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत निघाल्यावर पुन्हा एकदा नगरपंचायतीचे राजकारण तालुक्यात तापणार आहे. सध्या या १७ सदस्यीय नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक ८ सदस्य राष्ट्रवादी पक्षाकडे असून ४ सदस्य भाजपजवळ, ३ सदस्य काँग्रेसकडे तर २ सदस्य शिवसेनेजवळ आहेत. एका उमेदवाराचा केवळ एक मताने पराभव झाल्याने राष्ट्रवादी बहुमतापासून वंचित झाली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप व सेनेची युती होऊन राष्ट्रवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारण किंवा ओबीसी प्रवर्गासाठी निघाल्यास घोडेबाजाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी किंवा एसटी व एससी प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यास अविरोध निवडून येण्यासाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्यांना मतदारांची पसंती
By admin | Published: November 05, 2015 12:21 AM