प्राप्त माहितीनुसार, शिरजगाव कसबा ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणुकीत रतनपूर, सायखेडा ग्रामपंचायतच्या मतदारांनी वॉर्ड क्रमांक ४ करिता व देऊरवाडा ग्रामपंचायतीच्या मतदारांनी वॉर्ड क्रमांक ३ करिता मतदान केले. आपण विजयी उमेदवार आहात, आपण रॅली काढू नये, असे ठाणेदारांनी पत्र दिले आहे. अशा अनेक इतर मुद्द्यांमुळे सदरची निवडणूक गैरमार्ग व चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने सदरची निवडणूक रद्द करावी. नव्याने निवडणूक घ्यावी, अशा अशा आशयाची याचिका वॉर्ड क्रमांक ३ करिता प्रशांत ठाकरे व वॉर्ड क्रमांक ४ करिता सुरेखा राजकुमार निचत, राजेंद्र महादेवराव याऊल व लता नामदेवराव गाडगे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम १५ अन्वये चांदूर बाजार न्यायालयात दाखल केली आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार, उभे असलेले उमेदवार व विजयी उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ११ फेब्रुवारीला होत आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक ३ व वॉर्ड क्रमांक ४ चे विजयी उमेदवारांना मतदान करता येईल काय, हे न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून राहणार आहे.