लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे. मात्र संपूर्ण वरूड तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मागील सात दिवसांपासून शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. यामुळे सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची वाताहत होत आहे. शेतकºयांचा संताप अनावर होत असून वाघिणीसह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी केली जात आहे.बोर अभ्यारण्यातील नरभक्षी वाघीण आष्टीच्या जंगलातून वरूड तालुक्यात आली. गाय व कालवडीचा फडशा पाडल्यावर एका महिलेला ठार केले. यानंतर वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेत 'सर्च आॅपरेशन' सुरू केले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हैदराबादवरून विशेष टीम बोलाविण्यात आली. या टीमचे नेतृत्व शेख नवाब अली खान हे करीत होते. या चमुकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असून नरभक्षी, पिसाळलेल्या वन्यपशुंना जेरबंद करण्यात त्यांचा हातखंडा आहे, असेही सांगण्यात आले. वरूड तालुक्यातील घोराड शेतशिवारात दोन दिवस वाघीण तळ ठोकून होती. या दोन दिवसांत वाघिणीला जेरबंद करण्यात अपयश आल्यानंतर शेतकºयांचा संताप उफाळून आला आहे. मागील सात दिवसांपासून घोराड, ढगा, डवरगाव शिवारातील शेतकरी शेतात जाण्यास धाजवत नाहीये. यामुळे सोयाबीनची मळणीची कामे अडकून पडलेली आहेत.विद्यार्थ्यांमध्ये भीती कायमवाघिणीने नागपूर जिल्ह्यात पलायन केले असले तरी तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातून ती भीती निघालेली नसल्यामुळे भय कायमच आहे. यामुळे शाळामध्येसद्धा विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. सोमवारपासून या भागातील विद्यार्थी नियमित शाळेत येतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.ओलिताचा प्रश्न कायम !वाघिणीच्या भीतीने शेतकरी शेतात जात नाहीत. कपाशी, संत्रा, सोयाबीन, मिरची व अन्य भाजीपिकांना फटका बसत आहे. भारनियमनामुळे रात्री ओलित करणारे शेतकरी शेतात जात नसल्याने या भागात दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे. जनावरे जंगलात चराईसाठी पाठविली जात नसल्याने चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघिणीला मारणार नाही, हुसकवून लावणारमानवी वस्तीत शिरलेल्या वाघिणीला ठार करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहे. तिला हुसकावून लावणे सर्वांत सोपे आहे. तिचे लोकेशन रस्क्यू पथकाला ट्रेस होत आहे. फटाके फोडून तिला पळवून लावण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.वनविभागाचे रेस्क्यू पथक २४ तास लोकेशननुसार तिच्या मागावर असल्याने ती आपल्या तालुक्यात नाही. यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तरीदेखील बचावाकरिता हातात काठी असू द्यावी. वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वनविभाग, पोलीस पाटील, तलाठी यांना माहिती द्यावी.- राजेंद्र बोंडे, सहायक वनसरंक्षक, वरूडवाघ जरी या परिसरात नसला तरीदेखील वाघाची दहशत कायम आहे. मजूर कामावर येण्यास नकार देत आहेत. शेतमजुरांच्या मनातील भीती निघालेली नाही. ही पिक ांची मळणी करण्याची वेळ आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.उत्तम आलोडे, शेतकरीवाघाला लोकांना पाहिल्याने त्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघ परत येऊ शकतो. यातही एका महिलेला ठार केल्यामुळे भिती वाढली आहे. वाघीण मानसांचा शिकार करते ही घटना ताजी आहेच. वनविभागाने नागरिक ांना आश्वस्त करण्याची गरज आहे.- राजेंद्र पाटील, शेतकरी
वाघिणीची दहशत कायम, कामाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:19 PM
तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे.
ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : बंदोबस्त करण्याची मागणी, अधिकारी म्हणतात आता भीती कसली ?