अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : संपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. नागरी व ग्रामीण भागात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा सुरु असून त्याअंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळ या सर्व ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात येत आहे. स्थानिक क्रीडा संकुल नगरापासून एक किमी अंतरावर असल्याने क्रीडा संकुलास स्वच्छतेसाठी स्वच्छता दुतांची प्रतिक्षा आहे.नगारी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात पुढे यावे ह्या सद्हेतूने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तालुका स्तरावर क्रीडा संकुल व ग्रामीण भागात व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला. मागील काही वर्षापासून तालुका पातळीवर क्रीडा संकुल बांधकाम करुन उपलब्ध करुन दिले पंरतु इमारत बांधकाम व क्रीडांगण तयार करणे याशिवाय इतर काहीही होवू शकले नाही. क्रीडा संकूलावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न निर्माण होतो. शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा अधिकारी व तत्सम पदांची निर्मिती नियुक्ती कशी व केव्हा होणार? देखभाल व दुरुस्तीकरीता निधी दिल्या जात आहे किंवा कसे असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.
क्रीडा संकुलाला स्वच्छतादूतांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:47 PM
अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : संपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. नागरी व ग्रामीण भागात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा सुरु असून त्याअंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळ या सर्व ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात येत आहे. स्थानिक क्रीडा संकुल नगरापासून एक किमी अंतरावर ...
ठळक मुद्देसंपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. नागरी व ग्रामीण भागात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा सुरु असून त्याअंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे,