शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अचलपूरमध्ये कोरोना रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:13 AM

अनिल कडू फोटो पी ११ परतवाडा पान ३ चे लिड परतवाडा : अचलपूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात ...

अनिल कडू

फोटो पी ११ परतवाडा

पान ३ चे लिड

परतवाडा : अचलपूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज शहरी आणि ग्रामीण मिळून शंभर ते सव्वाशे रुग्ण निघत आहेत. यात अस्तित्वात असलेली आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. आपल्याला बेड मिळेल, या आशेने कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरवर ते गर्दी करीत आहेत. बेडकरिता त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रतीक्षेनंतरही बेड न न मिळाल्यामुळे नाईलाजाने त्यांना घरी परतावे लागत आहे.

घरी परतलेल्या या रुग्णांंसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शहरी भागासह ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू आहे. कोरोनाचा प्रसार करण्यास ते कारणीभूत ठरत आहेत.

अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरातील डेडीकेटेड कोविड रुगणालयात ७० बेड, आंबेडकर वसतिगृहात ८० बेड आणि धारणी रोडवरील बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये १०० बेड आहेत. पण, वाढत्या रुग्णांपुढे ही व्यवस्था कमी पडत आहे. यात कोरोना रुग्ण बेड न मिळाल्यामुळे भटकत आहेत. औषधोपचारापासून वंचित राहत आहेत.

दरम्यान, कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरला औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आवश्यक त्या औषधी रुग्णांना मिळत नाहीत. दिल्या जात नाहीत, तर औषधांचा पुरवठा मागणीनुसार केला जात नाही. यामुळे औषध कमी पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

यंत्रणा सुन्न

अचलपूर नगर परिषदेच्या संबंधित यंत्रणेकडून शहरातील कोरोना रुग्णांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नुसता बोलाचाच भात नि बोलाचीच कढी अन् प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला नगर परिषदेची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. कोविड रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला रुग्ण पाठवताना त्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत किंवा नाही, याची खातरजमा संबंधित यंत्रणेकडून केली जात नाही. ही यंत्रणा सरळ कोरोना रुग्णांना चिठ्ठी देऊन केंद्रावर किंवा रुग्णालयात पाठविते. कशी तरी व्यवस्था करून ते रुग्ण ती चिठ्ठी घेऊन त्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला पोहोचतात. पण, तेथे त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत. तासनतास बेडची प्रतीक्षा करून त्यांना तेथून परतावे लागत आहे.

पालिकेचे क्वारंटाईन सेंटर केव्हा?

नगरपालिकेने या कोरोना महामारीत अद्याप आपले क्वारंटाईन सेंटर सुरू केलेले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या टर्ममध्ये अचलपूर नगर परिषदेकडून तीन क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. आज हे क्वारंटाईन सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातच अचलपूर तालुका वैद्यकीय अधिकारी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाल्या. कोरोना लसींचे दोन डोज झाल्यानंतर त्या कोरोना संक्रमित आल्या आहेत. यात त्या २३ मेपर्यंत सुटीवर असल्याची सूत्राची माहिती आहे.

फोटो :- कोरोना संक्रमित वडिलांना सोबत घेऊन बेडकरिता भटकंती करीत असलेला युवक