शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

राज्याच्या ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद्यविक्रीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:21 PM

ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद्यविक्रीची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देनिर्णय प्रलंबित ५ ते १० हजार लोकसंख्येसाठी नवे निकष के व्हा?

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबतचे मापदंड राज्य शासनाने ठरवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच कळविले आहे. मात्र, यासंदर्भात शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद्यविक्रीची प्रतीक्षा कायम आहे.राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालतच्या ५०० मीटर परिसरात दारूबंदी करण्याचा निर्णय १५ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. मात्र, हा निर्णय महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील परवानाधारक दारूविक्रेत्यांना लागू नाही, असे पुन्हा नव्या आदेशात स्पष्ट केले. नव्या आदेशात ग्रामपंचायत हद्दीतील परवानाधारक दारूविक्रेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात १३ डिसेंबर २०१७ रोजी हॉटेल सोनई बार विरुद्ध स्टेट आॅफ महाराष्ट्र व इतर अशी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे कळविले आहे.मात्र, दीड महिन्यांपासून यासंदर्भात कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गालगतच्या दारूबंदीबाबतची स्थगिती स्वत: सर्वोच्च न्यायालयाने नव्या आदेशाद्वारे उठविली आहे. त्यामुळे राज्यातील १५ हजार ५०० दारूविक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लेखी राज्यात २५ हजार ५०० दारूविक्रीची दुकाने आहेत.नव्या मापदंडानुसार गावांची माहिती गोळासर्वोच्च न्यायालयाने दारूविक्री दुकानास परवानगी देताना विकसित भाग हा मापदंड लावून निर्णय दिल्यानंतर राज्य शासनाने त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरील गावांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. यात पाच हजारांपुढे लोकसंख्या असलेल्या गावांची यादी मागवून ते विकसित असल्याबाबतची खातरजमा जिल्हास्तरावरील राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे.सर्वोच्च न्यायालयाने गावांच्या विकासाचे मापदंड लावले असून, त्यानुसार गावस्तरावरील अहवाल मागविला जात आहे. नियमानुसार परवानाधारक दारूविक्रीबाबत निर्णय घेतला जाईल.- चंद्रशेखर बावनकुळे, उत्पादन शुल्क व ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :liquor banदारूबंदी