रबी २०१६ : राज्याचा हिस्सा जमा, केंद्राचा बाकीअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात १५ हजार ८२४ शेतकऱ्यानी सहभाग नोंदवून २० हजार १४६ हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित केला. यासाठी ४१ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा हप्ता भरणा केला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. अचलपूर तालुक्यात २४८ शेतकऱ्यांनी २९३ हेक्टरसाठी ४६ कोटी ३८ लाख ५३६ रुपयांचा विमा संरक्षण करून ५५, १२७ रुपयांचा हप्ता भरणा केला. अमरावती तालुक्यात ६९८ हेक्टरसाठी २ लाख ७, ८७९ भातकुली तालुक्यात २, १७६ शेतकऱ्यांनी २, ६७४ हेक्टरसाठी पाच लाख ५८ हजार ९२३ रुपयांचा, चांदूरबाजार तालुक्यात ३८९ शेतकऱ्यांनी ४३४ हेक्टरसाठी ८७ हजार ६४ रुपयांचा, चांदूररेल्वे तालुक्यात ३७६ शेतकऱ्यांनी ३९७ हेक्टरसाठी ८७, ८७५ रुपये, चिखलदरा तालुक्यात २४६ शेतकऱ्यांनी १९४ हेक्टरसाठी ३५, ६८० रुपयांचा विमा हप्ता भरणा केला. दर्यापूर तालुक्यात ७, ९४९ शेतकऱ्यांनी ११ हजार ५४२ हेक्टरसाठी २४ लाख ४८, ७८३ रुपये, धामणगाव तालुक्यात ५६८ शेतकऱ्यांनी ६७८ हेक्टरसाठी एक लाख ३९, ८३१ रुपये, मोर्शी तालुक्यात ८१ शेतकऱ्यांनी १०८ हेक्टरसाठी ३०, २१८ रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १, ६१६ शेतकऱ्यांनी १, ५२५ हेक्टरसाठी दोन लाख ३५, ४९५ रुपये, तिवसा तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३४७ हेक्टरसाठी ५३, ९४९ रुपये, वरुड तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टरसाठी ८६ हजार ८ रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र अद्यापही रबी पीक विमा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाचा ४०७ कोटींचा वाटा जमाराष्ट्रीय कृषी योजनेंंतर्गत रबी हंगाम २०१५-१६ करिता शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ४०७ कोटी ९४ लाख २६ हजार ६६१ रुपयांचा वाटा भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा केला आहे. मात्र, केंद्राचा वाटा अद्यापही जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकलेला नाही.
१६ हजार शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा
By admin | Published: February 02, 2017 12:05 AM