शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा

By admin | Published: May 29, 2017 12:07 AM

शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून....

पाच वर्षे पूर्ण : गिरीश खंडारे हत्याकांड सुनावणी ३० मे रोजी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून आता या हत्याकांडाची सुनावणी ३१ मे रोजी होणार असून खंडारे कुटुंबियांच्या न्यायाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.खंडारे कुटुंबच नव्हे तर सुनावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष सुद्धा लागले आहे.अवैध व्यावसायिकांविरूद्ध लढा देणाऱ्या गिरिश खंडारेवर २५ जुलै २०१२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान २९ जुलै २०१२ रोजी त्याचा मृत्यू झाला. २५ जुलै २०१२ च्या रात्री गिरिश खंडारे (२८,रा. चवरेनगर) हा त्याच्या तीन मित्रांसोबत घरी जात होता. गिरीशवर ७९ घावअमरावती : असताना गणेशनगर ते चवरेनगर मार्गावरील ‘परी स्टेशनरी’ प्रतिष्ठानासमोर हा प्राणघातक हल्ला झाला होता. आरोपींंनी गिरिशवर तलवार, चाकू व काठ्यांनी वार केल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याची बहिण समता खंडारे हिने घटनास्थळी धाव घेऊन त्याला तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. बहिणीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सोन्या चांदूरकर (४०, रा. सरोज कॉलनी), गजेंद्र तिडके (३५,रा. महावीरनगर), गोलू तायडे (२५), प्रकाश तायडे (दोन्ही रा.शिवाजीनगर), प्रवीण मोहोड, सुधीर मोहोड, दीपक मोहोड व रोशन कडूविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३०२, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करून मृतदेह न उचलण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शवविच्छेदनानंतर गिरिशवर शस्त्राचे तब्बल ७९ घाव आढळले होते. त्यामुळे गिरिशची अमानुषपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. नागरिकांचा रोष व तणावाची स्थिती बघता पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेतला आणि त्यांना काही दिवसांतच अटक केली होती. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आता या हत्याकांडाला पाच वर्षे पूर्ण झाले असून गिरिश खंडारेची आई, पत्नी व बहिण न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. ३० मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) ज्ञानेश्वर मोडक यांच्या न्यायालयात हा अंतिम निर्णय होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे अभियोक्ता सुनील देशमुख यांनी बाजू मांडली असून त्यांना माजी जिल्हा सरकारी वकील विवेक काळे व शोएब खान यांचे सहकार्य मिळाले तर बचाव पक्षातर्फे अभियोक्ता प्रशांत देशपांडे, वसिम मिर्झा, वासुदेव नवलानी व यादव यांनी बाजू मांडली. गिरिशची बहिण समता खंडारे यांची न्यायालयात साक्ष होणार होती. दरम्यान चार अज्ञात इसमांनी खंडारेच्या घरी जाऊन समता खंडारेला साक्ष न देण्यासंदर्भात धमक्या दिल्या होत्या.बहिण, पत्नीचा त्यागगिरिशच्या हत्येनंतर खंडारे कुटुंबियांचा एकुलता एक आधार गेल्यामुळे त्याची आई, बहिण व पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. गिरिशसाठी त्यांनी आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याच्या बहिणीने लग्न केले नाही तर पत्नीने दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. गिरिशला न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी हा त्याग केला आहे.