शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांड : आरोपी राहुलचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 8:20 PM

‘माझी होणार नसशील तर..!’ हा चित्रपटात शोभणारा खुनशी इशारा खरा करणाºया राहुल भडला गुरुवारी रात्री पोलिसांनी मूर्तिजापूर येथून अटक केली.

अमरावती : ‘माझी होणार नसशील तर..!’ हा चित्रपटात शोभणारा खुनशी इशारा खरा करणाºया राहुल भडला गुरुवारी रात्री पोलिसांनी मूर्तिजापूर येथून अटक केली.  त्यावेळी तो विष प्राशन केलेल्या अवस्थेत होता. नांदण्यास तयार नसलेल्या पत्नीची त्याने त्यापूर्वी सकाळी अमरावतीच्या साईनगर भागात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली.      राहुल बबनराव भड (रा.हंतोडा, ता. अंजनगावसुर्जी) याच्या पाळतीवर असलेल्या अमरावती पोलिसांच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या आधारे मूर्तिजापूर गाठून त्याला अटक केली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुलकडून हत्येसाठी वापरलेला चाकू व वाहन जप्त करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहेत.अमरावती येथे वास्तव्यास असलेला राहुलने प्रेमप्रकरणातून प्रतीक्षा मेहत्रे या युवतीशी १० आॅक्टोबर २०१३ रोजी गुपचूप लग्न उरकले. यशोदानगरातील देव महाराज संस्थानात हिंदू रीतीने विवाह पार पडला. यासंबंधाने त्याने नोटरीसुद्धा केली आहे. मात्र, यानंतर प्रतीक्षा तिच्या माहेरीच राहत होती. दोघांनी लग्न केल्याचे प्रतीक्षाच्या आई-वडिलांनाही माहिती नव्हते. यादरम्यान एकदा राहुलने प्रतीक्षाला मागणी घातली. मात्र, तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. राहुलने प्रतीक्षाच्या कुटुंबीयांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा विरोध ठाम होता. प्रतीक्षानेही राहुलसोबत जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे राहुलने  प्रतीक्षासोबत लग्न झाल्याचा दावा करीत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण नेले. एक तर नांदायला ये, नाही तर सोडचिठ्ठी दे, असे त्याने कळविले. दुसरीकडे तिचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. या कालावधीत प्रतीक्षाने राहुलविरोधात पाच पोलीस तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे राहुलच्या मनात प्रचंड राग धुमसत होता. 

बॉक्स हत्येपूर्वी प्रतीक्षाच्या वडिलांना धमकी प्रतीक्षाच्या हत्येच्या एक दिवसापूर्वी राहुलने पुन्हा तिच्या वडिलांना धमकी दिली. याबाबत फे्रजरपुरा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. यानंतर गुरुवारी राहुलने प्रतीक्षाला साईनगरातील वृंदावन कॉलनी परिसरात गाठले आणि चाकूचे नऊ वार करून तिची हत्या केली. 

खुनानंतर विष केले प्राशनतुला दुसºयाची होऊ देणार नाही. तुला मारेन आणि मीही संपेन, अशी धमकी राहुलने दिली होती. प्रतीक्षाचा खून केल्यानंतर तो दुचाकीने दारव्हाच्या दिशेने गेला. यानंतर तो मूर्तिजापुरात पोहोचला. मूर्तिजापुरातील एका कृषिसेवा केंद्रावरून फवारणीचे विषारी औषध खरेदी केले आणि पाण्यात टाकून त्याने प्राशन केले. 

राहुलच्या शोधात तीन पथके रवाना करण्यात आली होती. हत्येनंतर राहुल हा दारव्हा ते मूर्तिजापूर असा गेला. अटक केली त्यावेळी त्याने विष प्राशन केले होते. त्याला अटक करून अमरावतीला आणण्यात आले. पत्नी नांदायला येत नसल्यामुळे तिचा राहुलने खून केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. शशिकांत सातव, पोलीस  उपायुक्त.