शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाच

By admin | Published: November 12, 2016 12:09 AM

दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली.

बँका हाऊसफुल्ल : एटीएमवर उसळली गर्दी अमरावती : दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली. मात्र, दोन हजाराच्या नवीन करन्सीचे वाटप विविध बँकानी केले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह को-आॅपरेटिव्ह बँकांमध्येही शुक्रवारी गर्दी उसळली. हजार-पाचशेच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बाद झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार काही काळापुरते ठप्प झाले आहे. एका दिवसांत एटीएममधून दोन हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे व बँकेतून एका व्यक्तीला केवळ चार हजारांच्याच नोटा बदलून मिळत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांचीही हवा निघाली आहे. अनेक किरकोळ व्यापारी जुन्या पाचशे रुपयांचा नोटा स्वीकारायला नकार देत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभर, पन्नासच्या नोटांना दोन दिवसांत अचानक महत्त्व प्राप्त झाले असून या नोटांचे चलन वाढले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यतील सर्व बँकांमध्ये जुन्या पाचशे व हजारांच्या नोेटा परत करुन नवीन चलनाची किंवा शंभर, पन्नास व दहा रूपये मिळविण्यासाठी बँकेत नागरिकांची रांग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर नागरिक व बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झालेत. शुक्रवारी शहरातील अनेक एटीएम मशीन बंद होत्या. तर अनेक एटीएम मशीनमध्ये दोन हजारांची नवीन करन्सी न पोहोचल्याने शंभरच्या नोटांवरच काम भागवावे लागले. वाढती गर्दी पाहता श्याम टॉकीज चौकातील स्टेट बँकेची मुख्य शाखा निर्धारित वेळेपेक्षा १५मिनिट आधी बंद करण्यात आली. पोस्टाला मिळाला नाही २० लाखांचा विड्रॉलचलनातून अचानक पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने याचा फटका सर्व शासकीय कार्यालयांच्या आर्थिक व्यवहारालाही बसला आहे. गुरुवारी एसबीआयच्या मुख्य शाखेकडे मुख्य डाकघराने २० लक्ष रुपयांचा विड्रॉल टाकला होेता. पण, गुरुवारी दिवसभर हा विड्रॉल मिळाला नाही. शुक्रवारी बँकेने हा विड्रॉल स्वीकारला. पण चार वाजेपर्यंत पोस्टाला पैसे प्राप्त न झाल्याने जून्या चलनावरच कारभार चालवावा लागला. अशीच परिस्थिीती जिल्हाभरातील पोस्टाच्या विविध शाखांची होती. विड्रॉलचे पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची उर्मट वागणूकस्थानिक राठीनगर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून अपमानस्पद व उर्मट वागणूक मिळाली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान गर्दी कमी असतांनाही पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहक गेले असताना बॅकेचे खातेदार नसल्याने तुम्हाला नोटा मिळणार नाहीत, असे म्हणून ग्राहकांशी वाद घातला. शाखा व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबी ग्राहकांनी दिल्यानंतर ग्राहकांना नोटा बदलून देण्यात आल्यात. शुक्रवारीही नवीन नोट पोहोचलीच नाहीअमरावती : पण बँकेत आतमध्ये उपस्थित ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत नोटा बदलून दिल्या. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाचशेची नवीन नोट दाखल न झाल्याने नागरिकांची निराशाच झाली. एसबीआयच्या मुख्य शाखेत दुसऱ्या दिवशीही चार वाजेपर्यंत नवीन पाचशे रूपयांच्या नोटा आरबीआयकडून प्राप्त न झाल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगतिले. काही लोकांना दोेन हजार रुपयांच्या नोटा मिळताच त्यांनी सेल्फीचा आनंदही लुटला.