निर्णय : पोलीस आयुक्तांचे पाऊलअमरावती : महिला प्रवाशांच्या सुरक्षेकरिता मोर्शी मार्गावरील पॉवर हाऊसनजीकच्या वेलकम पॉईन्टवर वेटिंग रुमची व्यवस्था पोलीस विभागातर्फे करण्यात येणार आहे. या वेटिंग रुममध्ये दोन महिला पोलिसांसह एक पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांनी ही उपाययोजना केली आहे. शहरातील अनेक महिला व तरुणी पॉवर हाऊसनजीकच्या वेलकम पॉईन्टवरील ट्रॅव्हल्स थांब्यावरून विविध ठिकाणी प्रवास करतात. त्याचप्रमाणे रात्री-बेरात्री इतर ठिकाणांहून अमरावतीत येणाऱ्या महिला-मुलींची संख्याही बरीच मोठी आहे. मात्र, बहुतांश ट्रॅव्हल्स रात्री वेळेत वेलकम पॉईन्टवर येतात. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी वेलकम पॉईन्टवर महिलासाठी वेटिंग रुम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वेटिंग रूमचे काम पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आले असून १० ते १५ दिवसांत ही प्रतीक्षा खोली तयार होईल. येथे महिला व पुरुष पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात राहतील. याकरिता पोलिसांना वेटिंगरुममध्ये सर्व सुविधा देण्यात येणार आहे.
वेलकम पॉईन्टवर महिलांसाठी वेटिंग रुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 12:52 AM