लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पाची चारही दारे उघडण्यात आली. अन्य तीन मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यात मोढी वाढ झाली आहे. मात्र, अप्पर वर्धातील जलसाठा १८ टक्क्यांवर स्थिरावला. या प्रकल्पाची दारे उघडण्याची अमरावतीकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.तालुक्यात व मध्यप्रदेश हद्दीत गेल्या तीन-चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ नोंदविली जात होती. परंतु, पाण्याचा येवा मंदावल्यामुळे सध्या जलाशयातील पाणीपातळी ३३५.३७ मीटर एवढी आहे. २ आॅगस्ट रोजी एकूण जलसंचय क्षमतेच्या १८.११ टक्के अर्थात १०२.१३ दशलक्ष घनमीटर जलसाठा असून, पाऊस सुरु होण्यापूर्वी जलाशयात केवळ १०.४० टक्के जलसाठा शिल्लक होता. परंतु, शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्य प्रदेशातून येणाऱ्या माडू नदीला व मोर्शी येथून वाहणाºया नळ व दमयंती नदीला पूर आल्याने धरणाच्या जलाशयात झपाट्याने वाढ होत होती. धरणाची दारे उघडण्यासाठी ३४२.३३ मीटर साठा आवश्यक असून, १ आॅगस्टच्या सायंकाळी ६ वाजेपर्य$ंत ही पातळी ३३५.३७ मीटर झाली. सध्या मोर्शी तालुक्यात पावसाची जोर मंदावला असून, धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळल्यास तसेच मध्य प्रदेशातील जाम व वर्धा नदीला पूर आल्यास जलाशयाची पातळी ३४२ मीटरपर्यंत येईल. त्यानंतर तेराही दारे केव्हाही उघडू शकतात.अमरावती मोर्शीचा पाणी प्रश्न मिटलासद्यस्थितीत पुराने शेतकरी व ग्रामीण जनतेचे नुकसान झालेले नाही. जलाशयात ३४३.५० मीटर पातळी होईपर्यंत धरणाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, असे बोलले जाते. येणाºया पर्यटकांना धरण बघण्याकरिता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, अमरावती, मोर्शी, बडनेरा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शुक्रवारी अप्परवर्धा धरणाने ३३५.३७ मीटर पातळी गाठली, हे विशेष.
अप्पर वर्धाची दारे उघडण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:19 AM
अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पाची चारही दारे उघडण्यात आली. अन्य तीन मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यात मोढी वाढ झाली आहे. मात्र, अप्पर वर्धातील जलसाठा १८ टक्क्यांवर स्थिरावला. या प्रकल्पाची दारे उघडण्याची अमरावतीकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
ठळक मुद्देपाण्याची आवक मंदावली : येवा केवळ ५ ते १० टक्के