लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने वाघांबाबत नागरिकांमध्ये जागृती आणि प्रकल्पांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमरावीत रेल्वे स्थानकावर ‘वेलकम टू मॅजिकल मेळघाट रिझर्व्ह’ असे ठळकपणे लक्ष वेधून घेणारे वाघांसह अन्य वन्यजिवांचे बोलके चित्र बघताच, भिंती बोलक्या झाल्याची प्रतिक्रिया आपसूकच ओठांवर येते.मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगेत वसलेला भूप्रदेश. निसर्गाच्या कुशीतील मेळघाट आदिवासी संस्कृतीचे जतन आणि व्याघ्र संगोपनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. येथील वैराट हे सर्वोच्च शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गडगा आणि डोलार अशा पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चिलाटी, पातुल्डा आणि गुगामल ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाटला १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले. सध्या ६७६.९३ कि.मी. भूमी राखीव आहे. तथापि, पर्यटकांना आकर्षित करण्यात राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत मेळघाट माघारला, हेदेखील नाकारता येत नाही. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ईको टुरिझम, निसर्गवारी, पर्यटकांची गर्दी वाढण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. या दृष्टीने मॉडेल रेल्वे स्थानकाच्या भिंती व्याघ्र प्रकल्पमय करण्यात आल्या आहेत. अमरावती हे मेळघाटचे प्रवेशद्वार असण्यावर या बोलक्या चित्रांनी शिक्कामोर्तब केले आहे.दुर्मिळ पक्ष्यांची चित्रे लक्ष वेधणारेबेलाकुंडचा पूल, गाविलगड किल्ला, सागवान वृक्षासह मेळघाटात मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, करकोचे, बलाक, बदके, सर्पगरू ड, ससाणे, घार, पोपट, रानघुबड, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना, चिमणी आदी रानपक्ष्यांची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत.मेळघाट नेमके आहे काय?मेळघाटात नेमके आहे काय, हे चित्रमय रूपात मांडण्यात आल्यामुळे अबोल असलेल्या भिंती आता बोलू लागल्याचा भास होतो. पट्टेदार वाघ, बिबट, रानगवे, सांबर, भेकर, अस्वले, रानडुकर, वानरे, चितळ, नीलगाय, चौशिंगे, भुईअस्वले, रानमांजर, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे आदी प्राण्यांची चित्रे रंगविण्यात आली आहेत.
बोलू लागल्या रेल्वे स्थानकाच्या भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:19 PM
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने वाघांबाबत नागरिकांमध्ये जागृती आणि प्रकल्पांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमरावीत रेल्वे स्थानकावर ‘वेलकम टू मॅजिकल मेळघाट रिझर्व्ह’ असे ठळकपणे लक्ष वेधून घेणारे वाघांसह अन्य वन्यजिवांचे बोलके चित्र बघताच, भिंती बोलक्या झाल्याची प्रतिक्रिया आपसूकच ओठांवर येते.
ठळक मुद्देलक्ष वेधतेय ‘वेलकम टू मॅजिकल मेळघाट रिझर्व्ह’