शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी भटकंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 9:18 PM

इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची सन २०१६-२०१७ या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजे सन २०१७-१८ या वर्षीची शिष्यवृत्ती केव्हा मिळेल

अमरावती : इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची सन २०१६-२०१७ या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजे सन २०१७-१८ या वर्षीची शिष्यवृत्ती केव्हा मिळेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिष्यवृत्तीसाठी चालू वर्षात २६६१.५० कोटी  खर्च झाल्याची आकडेवारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अधिकृतपणे जारी केली आहे.१६ लाख ८६ हजार ३०० ओबीसी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क आदींसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी संकेतस्थळावर ११ लाख ८३ हजार २१७ म्हणजे ७० टक्के विद्यार्थ्यांची देयके कोषागारात सादर करण्यात आली आहेत. याचा अर्थ ५ लाख ३ हजार ८३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची देयके अजूनही निघाली नाही. त्यांच्यापैकी २० हजार ३९९ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत तसेच ८९ हजार ३२४ विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे सादर केले नाहीत, हे वास्तव आहे. सन २०१६-२०१७ यावर्षी विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीचे २६६१.५० कोटी खर्च झाले असून, त्यापैकी २०१६ साठी १५५९.२५ कोटी, तर सन २०१७-२०१८ साठी ११०६.२५ कोटी आहेत. केंद्र व राज्य शासनाने सन २०१७-२०१८ मध्ये अनुसूचित जातीकरिता ७२६.२४ कोटी दिले आहेत. त्यापैकी आजतागायत ३६५.६८ कोटी खर्च झाले आहेत. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागस प्रवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने ११९२.७३ कोटी दिले आहेत. त्यापैकी ७४०.५७ कोटी खर्च झाले आहेत. त्यानुसार सन २०१७-२०१८ मध्ये एकूण प्राप्त तरतूद १९९८.९७ लाखांपैकी ११०६.२५ म्हणजे ५८ टक्के खर्च झाला असून, ८१३.७५ कोटी म्हणजे ४२ टक्के रक्कम आजही शिल्लक आहे. चालू वर्षात २०१६-२०१७ या वर्षात लाखो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे येत्या २०१७-२०१८ या वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

 कोषागारात देयके प्रलंबितचओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, आॅनलाइन प्रक्रियेचा बोजवारा उडाला. त्यामुळे  पुन्हा आॅफलाइन असा शिष्यवृत्तीसाठी प्रवास सुरू झाला. एकीकडे शिष्यवृत्तीसाठी निधी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. मात्र, कोषागारात देयके प्रलंबित का, हादेखील गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे.