राज्य शासनाचे आदेश धडकले : शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले धामणगाव रेल्वे : ‘हेडटू टेल’ सिंंचनाची व्यवस्था करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अप्पर वर्धाचे पाणी देण्याची प्रशासनाची घोषणा एकीकडे हवेतच विरली आहे. दुसरीकडे मागील ४० वर्षांपासून जुना धामणगाव येथील ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक ३ चे कार्यालय बंद करण्यात येणार आहे़ यासंदर्भात राज्य शासनाने ३० आॅक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. १ जानेवारी २०१६ पासून या कार्यालयाला कुलूप लावण्याचे आदेशात देण्यात आले आहे़ चांदूररेल्वे जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाले. १३ कोटी रूपयांच्या मिळालेल्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला आहे. यातून ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांची होती़ सर्वाधिक सिंचनाचा लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न जाधव यांच्यासह तत्कालीन सर्वपक्षीय नेत्यांची होती. आज पिण्याच्या पाण्याला प्रथम, शेतीला द्वितीय तसेच उद्योगाला पाणी वितरणात तृतीय क्रमांक मिळावा, असा कायदा आहे़ मात्र, शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांवर वेळोवळी आंदोलन करण्याची वेळ आली आहे़ असे असताना आता येथील कार्यालयच बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहे़ मंगरूळ, शेंदूरजना कार्यालयाला लागले कुलूपमध्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरावा म्हणून तब्बल १३७६़६४ कोटीमध्ये हा प्रकल्प ८४ किलोमीटर अंतरात विस्तारला आहे़ जुना धामणगाव येथे सन १९८१ मध्ये ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक तीनची स्थापना करण्यात आली़ आसेगाव, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव, शेंदूरजना खुर्द असे पाच उपविभाग त्यावेळी तयार करण्यात आले होते़ उपविभागीय अभियंता, पाच शाखा अभियंता, पाच तांत्रिक सहायक, एक वरिष्ठ लिपीक, एक कनिष्ठ लिपीक, शिपाई, मजूर असे उपविभागीय कार्यालयाला कर्मचारी देण्यात आले़जुना धामणगाव विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना प्रथम शेंदूरजनाखुर्द येथील उपविभागीय कार्यालय अमरावती येथे हलवून ऊर्ध्व वर्धा विभाग १ ला जोडले़ कालवा दुरूस्तीकरिता निधी मिळत नाही. त्यामुळे हे कार्यालय बंद केले आहे.
ऊर्ध्व वर्धा कार्यालय नव्या वर्षापासून बंद
By admin | Published: November 10, 2015 12:27 AM