वरुड : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास तालुका व शहर काँग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, कोमल पांडव, सविता काळे, रंजना मस्की, शैलजा वानखडे, नरेंद्र पावडे, मनीष कुबडे, पंचायत समिती सदस्य तुषार निकम, बाबाराव भोंड, मंगेश कोरडे, दीपक देशमुख, मुकेश देशमुख, सुनील पाटील, कैलास वानखडे, स्वप्निल खांडेकर, वसंत निकम, गणेश खरडे, गोपाल सोरगे, निरंजन घाटोळे, सुधाकर दोड, किसन गायकवाड, पांडुरंग घोरमाडे, शैलेश ठाकरे, प्रभाकर ठाकरे आदी शेतकरी बांधव आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------