वरूड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महात्मा फुले चौकात नियोजित जागेवर बसविण्याची मागणी बेदखल केल्याने संतापलेल्या नगरसेवकाने गुरूवारी पालिका कार्यालयालाच कुलूप ठोकले.
यासंदर्भात नगरसेवक धनंजय बोकडे यांनी दहा दिवस आधी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचे अंतिम हफ्ते देखील लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाहीत. त्याअनुषंगाने निद्रिस्त पालिका प्रशासन व सत्ताधारी गटाला जागे करण्यासाठी नगरपालिका कार्यालयास कुलूप ठोकण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांनी दिली. त्यांना अटक करण्यात आली. यात वरुड शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बंटी रडके, गोपाल सोरगे, शैलेश ठाकरे, कार्तिक चौधरी, अनुराग देशमुख, मकसूद पठान, बंटी काजी, हेमंत कोल्हे, विकास पांडे, शिक्षण सभापती प्रशांत धुर्वे, अजहर काजी, बाबलेश गडलिंग, वंदना म्हस्की, हाजी फरहान, नेपाल पाटील, बबलू शेख, अंकुश राऊत, मनोज इंगोले, गजानन पडोळे, बुद्धभूषण हरले, सनी शिरभाते, दीपक देशमुख सहभागी झाले.
---